RR vs DC, IPL 2021 Match 7 Result | ख्रिस मॉरीसचा ‘हल्ला बोल’, रंगतदार सामन्यात राजस्थानची दिल्लीवर 3 विकेट्सने मात
RR vs DC 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने
मुंबई : आयपीएल 2021 स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. दिल्लीने विजयासाठी राजस्थानला 148 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. राजस्थानकडून विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्रिस मॉरीसने 18 चेंडूत 36 धावा फटकावत सामन्यात राजस्थानला विजय मिळवून दिला. दरम्यान, दिल्लीच्या गोलंदाजांनी आज टिच्चून गोलंदाजी केली होती. दिल्लीकडून आवेश खानने 3. कगिसो रबाडाने 2 आणि ख्रिस वोक्सने 2 विकेट्स घेतल्या.(rr vs dc live score ipl 2021 match rajasthan royals vs delhi capitals scorecard online wankhede stadium mumbai in marathi)
RR vs DC Live Score जाणून घेण्यासाठी क्लिक करा
LIVE NEWS & UPDATES
-
ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानचा दिल्लीवर विजय
अखेरच्या षटकात 12 धावांची आवश्यकता असताना ख्रिस मॉरीसने पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत सामना दिल्लीच्या हातून हिरावला.
-
राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 12 धावांची गरज
राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीत आहे.
-
-
ऋषभ पंतकडून उनादकटला जीवनदान
कर्णधार आणि विकेटकीपर रिषभ पंतने सामन्यातील 18 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जयदेव उनाडकटला जीवनदान दिलं. पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरीसने फटका मारला. दोघांनी एक धावा पूर्ण केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी उनाडकट आग्रही होता. पण मॉरीसने त्याला परत पाठवले. यावेळेस उनाडकट मैदानात घसरला. पंतला रनआऊट करण्याची नामी संधी होती. मात्र चेंडू हातातून घसरल्याने उनाडकटला जीवनदान मिळाले.
-
राजस्थानला मोठा धक्का, डेव्हिड मिलर आऊट
राजस्थानला डेव्हिड मिलरच्या रुपात सातवा धक्का बसला आहे. मिलर सामना निर्णायक स्थितीत असताना बाद झाला. मिलरने 43 चेंडूत 7 फोर आणि 2 सिक्ससह 62 धावांची खेळी. केली. त्यामुळे आता राजस्थाला विजयासाठी 25 चेंडूत 44 धावांची आवश्यकता आहे.
-
डेव्हिड मिलरचे अर्धशतक
डेव्हिड मिलरने अर्धशतत झळकावलं आहे. मिलरच्या आयपीएल कारकिर्दीतील 10 वं अर्धशतक ठरलं.
FIFTY!@DavidMillerSA12 brings up his 10th #VIVOIPL 5️⃣0️⃣ and is keeping @rajasthanroyals in the hunt. https://t.co/8aM0TZxgVq #RRvDC #VIVOIPL pic.twitter.com/JSfL4Z5egi
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
-
-
राजस्थानला सहावा झटका
राजस्थानने सहावी विकेट गमावली आहे. राहुल तेवतियाने 19 धावांची खेळी केली. तेवतिया आणि डेव्हिड मिलरमध्ये सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली होती.मात्र ही जोडी कगिसो रबाडाने मोडीत काढली.
-
राजस्थानला डेव्हिड मिलर राहुल तेवतियाकडून आशा
राजस्थानने झटपट 5 विकेट्स गमाल्या. मात्र त्यानंतर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरने राजस्थानचा डाव सावरला आहे. त्यामुळे या जोडीकडून राजस्थानला मोठ्या आणि भागीदारीची अपेक्षा आहे. दोघांमध्ये 30 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. राजस्थानला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे.
-
राजस्थानची पाचवी विकेट
राजस्थानने पाचवी विकेट गमावली आहे. रियान पराग 2 धावांवर मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला.
-
राजस्थानला चौथा धक्का
राजस्थानने चौथी विकेट गमावली आहे. आक्रमक फलंदाज शिवम दुबे आऊट झाला आहे. आवेश खानने शिवमला स्लिपमध्ये असलेल्या शिखर धवनच्या हाती कॅच आऊट केलं. शिवम आऊट झाल्याने राजस्थानची 36-4 अशी स्थिती झाली आहे.
-
राजस्थानच्या पावर प्लेमध्ये 26 धावा
राजस्थानने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 26 धावा केल्या आहेत. राजस्थानने मनन वोहरा, जॉस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन या महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या.
The Powerplay is over and it has gone @DelhiCapitals' way!
After 6 overs, #RR are 26-3 and need 122 runs in 84 balls. https://t.co/8aM0TZxgVq #RRvDC #VIVOIPL pic.twitter.com/Mgh53mMfT3
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
-
राजस्थानला तिसरा धक्का
राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आऊट झाला आहे. त्यामुळे राजस्थानची 17-3 अशी स्थिती झाली आहे.
-
राजस्थानला पहिला धक्का
राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. मनन वोहरा आऊट झाला आहे. वोहराने सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग चौकार लगावला. मात्र त्यानंतर मनन वोहरा मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला.
-
राजस्थानचे सलामीवीर बटलर-वोहरा मैदानात
148 धावांचं आव्हान घेऊन राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर आणि मनन वोहरा मैदानात दाखल
-
राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे आव्हान
दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून जयदेव उनाडकटने 3 विकेट्स मिळवल्या.
-
दिल्लीची सहावी विकेट
दिल्लीने सहावी विकेट गमावली आहे. ललित यादवच्या रुपात दिल्लीला सहावा धक्का लागला आहे. ललितने 20 धावा केल्या.
-
दिल्लीला मोठा झटका
दिल्लीला मोठा झटका बसला आहे. कर्णधार रिषभ पंत चोरटी धाव घेण्याच्या नादात रन आऊट झाला आहे. पंतने 32 चेंडूत 9 चौकारांसह 51 धावांची खेळी केली.
-
कर्णधार रिषभ पंतचे शानदार अर्धशतक
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंतने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली अडचणीत असताना रिषभने निर्णायक क्षणी अर्धशतक लगावत दिल्लीचा डाव सावरला.
-
दिल्लीला चौथा झटका
दिल्लीला चौथा झटका बसला आहे. मार्कस स्टोयनिस शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे दिल्लीची 37-4 अशी स्थिती झाली आहे. -
दिल्लीच्या पावरप्लेमध्ये 36 धावा
दिल्लीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 36 धावा केल्या आहेत. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पावर प्लेमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्याने पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेला आऊट केलं.
-
दिल्लीला तिसरा झटका
जयदेव उनाडकटने दिल्लीला तिसरा झटका दिला आहे. जयदेवने आपल्या बोलिंगवर अजिंक्य रहाणेला कॅच आऊट केलं.
-
दिल्लीला दुसरा झटका
जयदेव उनाडकटने दिल्लीला दुसरा झटका दिला आहे. जयदेवने सलामीवीर शिखर धवनला विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती कॅच आऊट केलं आहे. संजूने स्टंपमागे हवेत झेपावत शानदार कॅच घेतला.
-
दिल्लीला पहिला झटका
दिल्लीला पहिला झटका बसला आहे. दिल्लीची 5 धावसंख्या असताना पृथ्वी शॉ आऊट झाला. पृथ्वीने 2 धावा केल्या.
-
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. लोकल बॉय पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामी जोडी मैदानात खेळत आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे.
-
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, मनन वोहरा, डेव्हीड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन साकरिया.
Match 7. Rajasthan Royals XI: M Vohra, J Buttler, S Samson, S Dube, D Miller, R Parag, R Tewatia, C Morris, J Unadkat, C Sakariya, M Rahman https://t.co/8aM0TZOSk0 #RRvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
-
दिल्ली कॅपिटल्सचे अंतिम 11 खेळाडू
रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अंजिक्य रहाणे, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, टॉम करन, ख्रिस वोक्स, खगिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन आणि आवेश खान
Match 7. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, A Rahane, R Pant, M Stoinis, C Woakes, L Yadav, R Ashwin, T Curran, K Rabada, A Khan https://t.co/8aM0TZOSk0 #RRvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
-
दोन्ही संघात प्रत्येकी 2 बदल
राजस्थान आणि दिल्लीमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे या मोसमातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे स्टोक्सच्या जागी डेव्हिड मिलरला संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहेय
तर दिल्लीच्या गोटात वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचे आगमन झालं आहे. तर अमित मिश्राच्या जागी ललित यादवला संधी मिळाली आहे. यानिमित्ताने ललितचे आयपीएल पदार्पण ठरलं आहे. ललित रणजी करंडकात दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो.
-
राजस्थानने टॉस जिंकला
राजस्थानने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून संजू सॅमसनने दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.
-
दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात 2 खेळाडूंची एन्ट्री
राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीच्या गोटात 2 खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या जागी मुंबईचा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीला संधी देण्यात आली आहे. तर दुखापतीमुळे 14 व्या मोसमाला मुकाव्या लागलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी कर्नाटकचा फलंदाज अनिल जोशीला संधी मिळाली आहे.
NEWS: Shams Mulani joins @DelhiCapitals as short-term COVID-19 replacement for Axar Patel; Anirudha Joshi replaces injured Shreyas Iyer. #VIVOIPL @Vivo_India
More details ? https://t.co/3z7AmJrDYr pic.twitter.com/HFsx6DVjpQ
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
-
दोन्ही संघ तुल्यबळ
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 22 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही टीमने प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत. यामुळे हा सामना नक्की कोण जिंकणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
-
राजस्थान विरुद्ध दिल्ली आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
Hello & good evening from Wankhede Stadium for Match 7 of the #VIVOIPL ??
It's @IamSanjuSamson's @rajasthanroyals who square off against the @RishabhPant-led @DelhiCapitals ⚡️⚡️#RRvDC @Vivo_India
Which team are you supporting tonight❓ pic.twitter.com/jG4lA8ejZa
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
Published On - Apr 15,2021 11:35 PM