Team India | साडे आठ मिनिटात 2 किलोमीटर रनिंग, टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीायचं ‘टार्गेट’
बीसीसीआयच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेपासून करण्यात येणार आहे.
मुंबई : खेळाडूंसाठी फिटनेस फार महत्वाचा असतो. खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना कसून सराव करावा लागतो. यासाठी अनेक खेळाडू जीममध्ये तसेच सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव करतात. या फिटनेसवरच सर्व काही अवलंबून असतं. क्रिकेटमध्ये (Cricket) धावा घेताना तसेच फिल्डिंग करताना खेळाडूंच्या फिटनेसचा कस लागतो. खेळाडूंना आता फिटनेस टेस्ट (Fitness Test) द्यावी लागणार आहे. बीसीसीआयशी (BCCI) करार केलेल्या प्रत्येक खेळाडूला या फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिलं आहे. (running 2 km in eight and a half minutes bcci target for team india players)
बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 2 किलोमीटर रनिंग अनिवार्य केली आहे. खेळाडूंना हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. या ठराविक वेळेत हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करावं लागणार आहे. वेगवान गोलंदाजांना 2 किलोमीटरचं अतंर 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करायचे आहे. तर विकेटकीपर, स्पिनर आणि फलंदाजांना हे अंतर 8 मिनिटं 30 सेकंदात हे अंतर पूर्ण करावं लागणार आहे. या रनिंगद्वारे खेळाडू शारिरीकरित्या किती फिट आहे, हे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंना आणखी सराव करावा लागणार आहे. या नव्या नियमाबाबतची माहिती खेळाडूंना देण्यात आली आहे.
बीसीसीआयने काय म्हटलंय?
“खेळाडूंचं फिटनेस त्यांच्या यशाचं रहस्य असतं. पण आता खेळाडूंना फिटनेसमध्ये आणखी सुधार करण्याची गरज आहे. हे करणं आपल्यासाठी महत्वाचे आहे. या ट्रायल रन चॅलेंजमुळे खेळाडू आणखी तंदुरुस्त होतील. बीसीसीआयकडून दरवर्षी खेळाडूंच्या फिटनेसचा आढावा घेतला जाईल”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.
नियमाची अंमलबजावणी केव्हापासून ?
या नव्या नियमाची अंमलबजावणी इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेपासून खेळण्यात येणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी खेळाडूंना ही फिटनेस टेस्ट देणं बंधनकारक राहणार आहे. याशिवाय आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट द्यावी लागणार आहे. खेळाडूंना ही टेस्ट बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट एकेडॅमीमध्ये किंवा टीम इंडियाच्या संबधित अधिकाऱ्यांसमोर देता येणार आहे.
संबंधित बातम्या :
England Tour India | “टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड”
England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?
#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
(running 2 km in eight and a half minutes bcci target for team india players)