SA vs IND: टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी सनसनाटी विजय
South Africa vs Team India Icc World Cup 2024 Final: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं.
टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होतं. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हन दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने 47 रन्स केल्या. शिवम दुबेने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्माने 9, रवींद्र जडेजाने 2 आणि हार्दिक पंड्याने 5* धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
17 वर्षांनी टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला
The wait of 17 years comes to an end 🇮🇳
India win their second #T20WorldCup trophy 🏆 pic.twitter.com/wz36sxYAhw
— ICC (@ICC) June 29, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.