Video : तो आला… अप्रतिम इनस्विंग टाकून त्रिफळा उडवला, पाकिस्तानी फलंदाज पाहतच राहिला!

कागिसो रबाडाने पाकिस्तानी बॅट्समन आबिद अलीचा शानदार त्रिफळा उडवला. | kagiso Rabada bowled pak Abid Ali

Video : तो आला... अप्रतिम इनस्विंग टाकून त्रिफळा उडवला, पाकिस्तानी फलंदाज पाहतच राहिला!
pak Vs Sa Rabada bowling
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 12:07 PM

कराचीपाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यात पहिला कसोटी सामना कराची इंटरनॅशनल स्टेडियमवर (Karachi International Stadium) खेळला जात आहे.फलंदाजांचा कर्दनकाळ असणाऱ्या कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) या मॅचमध्ये एक अफलातून क्लिन बोल्ड केला आहे. पाकिस्तानी बॅट्समन आबिद अलीचा (Abid Ali) त्याने शानदार त्रिफळा उडवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. (SA Vs Pak 1 St test kagiso Rabada bowled pak Abid Ali)

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला कराचीत सुरुवात झाली आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. केवळ 220 रन्सवर दक्षिण आफ्रिकेची टीम ऑलआऊट झाली. पण नंतर पाकिस्तानी फलंदाजही काही विशेष कामगिरी करु शकले नाहीत.

कागिसो रबाडाने पाकिस्तान विरुद्ध शानदार बोलिंग केली. कागिसोने इमरान बटचा अडथळा दूर केला. त्यापाठोपाठ रबाडाने आबिद अलीचा त्रिफळा उध्वस्त केला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होतोय.

सलामीचे फलंदाज इमरान बट्ट आणि आबिद अली फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचा स्कोअर अवघ्या 5 धावा होता. त्यावेळी रबाडाने अलीला एका अप्रतिम इनस्विंग बॉलवर बोल्ड केलं. बोल्ड झाल्यावर आबिद अली पीचकडे पाहू लागला. त्याला कळायला मार्ग नव्हता की आपण बोल्ड कसे झालो… ज्या रिताने बॉल इनस्विंग होऊन स्टम्पमध्ये आला ते पाहून अली हैरान झाला.

तत्पूर्वी, पहिल्या डावांत दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने सर्वाधिक 58 रन्स केले. पाकिस्तानी बोलर्सने दक्षिण आफ्रिकेला नियमित अंतराने धक्के दिले. पाकिस्तानच्या यासीर अलीने 3 विकेट्स घेतल्या. तर शाहीन शाह आफ्रिदी आणि नौमान अलीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेऊन अलीला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 258 धावांवर ऑलआऊट झाला.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाचीही निराशा झाली. अवघ्या 33 रन्सवर पाकिस्तानने 4 विकेट्स गमावल्या. इमरान बट्ट, आबिद अली, बाबर आजम आणि शाहीन शाह आफ्रिदीला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवलं.

हे ही वाचा :

30 शतकं आणि 11 हजारांपेक्षा अधिक धावा, पहिल्याच सामन्यात द्विशतक, तरीही टीम इंडियात निवड न होताच निवृत्त

Ind vs Eng | इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून ‘त्रिदेव’ मैदानात उतरण्याची शक्यता

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.