महिला गोलंदाजाचं सचिन तेंडुलकरला आव्हान, सचिन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर
ऑस्ट्रेलियाची महिला गोलंदाज एलिस पॅरीचं मैदानावर येऊन आपल्या गोलंदाजीवर खेळण्याचं आव्हान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वीकारलं आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाची महिला गोलंदाज एलिस पॅरीचं आव्हान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं स्वीकारलं आहे (Women cricketer challenge Sachin Tendulkar). एलिसने सचिनला मैदानावर येऊन आपल्या गोलंदाजीवर खेळण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर सचिननं मेलबर्नमध्ये एलिसच्या गोलंदाजीवर जोरदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियामध्ये जंगलांना लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून एलिस आणि सचिनने हा क्रिकेट सामना खेळला.
मेलबर्नमधील या सामन्याआधी एक दिवस एलिसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सचिन तेंडुलकरला आपल्या गोलंदाजीवर खेळण्याचं आव्हान दिलं होतं. एलिस म्हणाली होती, “नमस्कार सचिन. तु जर जंगलातील आगीने प्रभावित लोकांच्या मदतीसाठी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यात खेळू शकलास तर आम्हाला आनंद होईल. मला माहिती आहे की तु सध्या एका संघाला प्रशिक्षण देखील देत आहेस. पण तरीही तु तुझ्या या कामातून वेळ काढून येथे माझ्या गोलंदाजीवर एक ओव्हर खेळण्यासाठी यावं आणि फलंदाजी करावी.”
Ellyse Perry bowls ? Sachin Tendulkar bats
This is what dreams are made of ?pic.twitter.com/WksKd50ks1
— ICC (@ICC) February 9, 2020
यानंतर सचिनने जंगलातील आगीने प्रभावित लोकांच्या मदतीसाठी एलिसाच्या एका ओव्हरवर फलंदाजी केली. सचिनने एलिसच्या आव्हानाला उत्तर देत म्हटलं, “माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी मला खेळण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही मी तुझ्या गोलंदाजीवर एक षटक खेळण्यासाठी मैदानावर जरुर येईल. मला आशा आहे की यामुळे जंगलांना लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या पीडितांसाठी मोठा निधी जमा होईल. तसेच तु मला आऊट देखील करु शकशील, अशीही आशा करतो.”
Sounds great Ellyse. I would love to go out there & bat an over (much against the advice of my doctor due to my shoulder injury). Hope we can generate enough money for this cause, & to get me out there in the middle.
You can get involved & donate now on https://t.co/IObcYarxKr https://t.co/gl3IVirCBY
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 8, 2020
आयसीसीने सचिनच्या या सामन्यातील फलंदाजीचा व्हिडीओ ट्विट केला. यानंतर सोशल मीडियावर यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला.
सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नोव्हेंबर 2013 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. मेलबर्नच्या जंक्शन ओवल मैदानावर खेळल्या गेलेल्या या चॅरिटी मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतलेली असताना आणि दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजी केली. तब्बल साडेपाच वर्षांनंतर सचिनने पहिल्यांदा फलंदाजी केली.
सचिनने एलिसच्या पहिल्यादा चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर उपस्थित क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने आगीतील पीडितांच्या मदतीसाठी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच्या स्टंपचाही लिलाव केला.
या सामन्यातून आग पीडितांसाठी 55 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये मागील 4 महिन्यांपासून आग लागलेली आहे. प्रचंड उष्णतेमुळे या आगीवर नियंत्रण मिळवणे देखील अशक्य होत आहे. या आगीमुळे हजारो लोकांना आपलं घर सोडून इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे. आत्तापर्यंत या आगीत 34 लोकांना आपला प्राण गमवावा लागला. जुलै 2019 पासून आत्तापर्यंत न्यू साऊथ वेल्समध्ये 70 लाख एकर क्षेत्र आगीत जळून नष्ट झालं आहे.
Women cricketer challenge Sachin Tendulkar