Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin tendulkar) रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण (Sachin tendulkar Corona) झाली होती.

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
sachin tendulkar admitted to hospital after corona infected
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 6:11 PM

मुंबई :  माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin tendulkar) रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण (Sachin tendulkar Corona) झाली होती. मात्र पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन दिली आहे. (Sachin Tendulkar admitted to hospital after corona infected informed by tweet)

कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सचिनचं रुग्णालयातून ट्विट

सचिनने ट्विट करत सांगितलंय, “शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काहीच मी घरी परतेन. तुम्हीही तुमची काळजी घ्या, सुरक्षित रहा…”

वर्ल्ड कप जिंकून बरोबर 10 वर्ष पूर्ण, सचिनच्या खास शुभेच्छा

आज भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. याच संघाचा सचिन एक भाग होता. याच दिवसाचं निमित्त साधून सचिनने संपूर्ण भारतवासियांना तसंच संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकरला 27 मार्चला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग

सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने धुवांधार बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा फटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

(Sachin Tendulkar admitted to hospital after corona infected informed by tweet)

हे ही वाचा :

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.