Sachin Tendulkar : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना, म्हणाला, ‘सचिन कोरोनालाही सीमेपार पाठवेल”

पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती सचिनने ट्विट करुन दिली आहे. त्यावर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमनेही सचिनच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

Sachin Tendulkar : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना, म्हणाला, 'सचिन कोरोनालाही सीमेपार पाठवेल''
सचिन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 6:17 PM

मुंबई : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन दिली आहे. त्यावर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमनेही सचिनच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.(Former Pakistan cricketer Wasim Akram’s prayer for Sachin Tendulkar)

“जेव्हा तुम्ही 16 वर्षाचे होता, तेव्हा जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाचांचा सामना मोठ्या हिमतीने केलात. मला विश्वास आहे की तुम्ही कोविड – 19 विषाणूलाही सीमापार पाठवाल. लवकर बरे व्हा मास्टर. डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत भारताचा वर्ल्डकप 2011 चा वाढदिवस साजरा करा, मला एक फोटो पाठवा”, असं ट्विट वसिम अक्रमने केलं आहे. तत्पूर्वी सचिन तेंडुलकरने एक ट्विट करत आपण रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली.

सचिनचं रुग्णालयातून ट्विट

सचिनने ट्विट करत सांगितलंय, “शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काहीच मी घरी परतेन. तुम्हीही तुमची काळजी घ्या, सुरक्षित रहा…”

सचिन तेंडुलकरला 27 मार्चला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

संबंधित बातम्या :

Video : ‘सचिन पाजी’ला लवकर आराम मिळो, युवराजची प्रार्थना, व्हिडीओमधून वर्ल्डकपच्या आठवणी जागवल्या

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Former Pakistan cricketer Wasim Akram’s prayer for Sachin Tendulkar

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.