सचिन तेंडुलकरसह ‘या’ 3 दिग्गजांना ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान
आयसीसीने (ICC) भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये (ICC Cricket Hall of Fame) समावेश करुन सन्मान केला आहे.
लंडन: आयसीसीने (ICC) भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये (ICC Cricket Hall of Fame) समावेश करुन सन्मान केला आहे. सचिनसोबत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड (Allan Donald) आणि ऑस्ट्रेलियाची दोनदा विश्वचषक विजेता महिला क्रिकेटर कॅथरीन फिट्जपॅट्रिक (Cathryn Fitzpatrick) यांचाही क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश आहे.
लंडनमधील मॅडम तुसाद म्युझियममध्ये आयोजित सन्मान कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचे म्हटले. 46 वर्षांच्या सचिनची तुलना अनेकदा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याशी केली जाते. सचिन एकदिवसीय आणि कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचाही विक्रम आहे. सचिनने एकूण 34,357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तसेत तो 100 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकणारा एमकेव खेळाडू आहे.
Highest run-scorer in the history of Test cricket ✅ Highest run-scorer in the history of ODI cricket ✅ Scorer of 100 international centuries ?
The term ‘legend’ doesn’t do him justice. @sachin_rt is the latest inductee into the ICC Hall Of Fame.#ICCHallOfFame pic.twitter.com/AlXXlTP0g7
— ICC (@ICC) July 18, 2019
दक्षिण आफ्रिकेचे 52 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज डोनाल्ड यांनी 2003 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी 330 कसोटी आणि 272 एकदिवसीय विकेट घेतल्या आहेत. कॅथरीन फिट्जपॅट्रिक या महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या दुसऱ्या महिला गोलंदाज आहेत. त्याच्या नावावर 181 एकदिवसीय आणि 60 कसोटी विकेट आहेत. प्रशिक्षण म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला 3 वेळा विश्वचषक मिळवून दिला.
A ? with the three ICC Hall of Fame inductees ? #ICCHallOfFame pic.twitter.com/cXnL1Ln6W2
— ICC (@ICC) July 18, 2019
सचिनच्या आधी हा सन्मान मिळालेले भारतीय खेळाडू
- राहुल द्रविड
- बिशन सिंह बेदी
- कपिल देव
- सुनील गावस्कर
- अनिल कुंबळे
‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ काय आहे?
‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ एक असा समुह आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित करणे हा याचा उद्देश आहे. आयसीसीने ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन’च्या मदतीने हा पुरस्कार सुरु केला होता. सुरुवातीला या यादीत 55 खेळाडूंचा सहभाग होता. या सुरुवातीच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन, एलन बॉर्डर आणि इमरान खान यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.
अन्य देशांच्या तुलनेत हॉल ऑफ फेममध्ये ब्रिटीश खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यानंतर दरवर्षी या समुहात नव्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश केला जातो. मागील वर्षी भारताचा माजी क्रिकेटर ‘द वॉल’ राहुल द्रविड, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटर क्लारा टेलरचा समावेश करण्यात आला होता.