मुंबई : यंदाच्या आयपीएल 2020 (IPL 2020) हंगामात आतापर्यंतच्या मॅचेस अत्यंत रोमांचक झाल्या. आतापर्यंत 3 संघांनी प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. यंदाच्या हंगामातील बऱ्याचश्या मॅचेस क्रिकेट रसिकांच्या डोळ्याच्या पारणे फेडणाऱ्या होत्या. मात्र या हंगामातील एका घटनेने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चिंतातूर झाला. एक व्हिडीओ शेअर करत बॅट्समनला हेल्मेट किती महत्त्वाचं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न सचिनने केला आहे. तसंच फास्टर बॉलर असो वा स्पिनर… बॅट्समनने हेल्मेट घालायलाच हवे, असा नियम आयसीसीने करणं गरजेचं असल्याचं सचिनने म्हटलं आहे. (Sachin Tendulkar Special Appeal From ICC)
सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू विजय शंकर पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतीपासून अगदी थोडक्यात वाचला. किंग्ज XI पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यानच्या सामन्यात विजय शंकर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी निकोलस पूररने जोरदार थ्रो मारला. तो बॉल विजय शंकरच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. प्रथम दर्शनी विजय शंकरला खूप मोठी दुखापत झाल्याचं सगळ्याच क्रिकेट फॅन्सना वाटलं. सचिन तेंडुलकर देखील याच घटनेने चिंतातूर झाला. मात्र हेल्मेट असल्याने मोठी दुखापत होणयापासून विजय शंकर वाचला.
The game has become faster but is it getting safer?
Recently we witnessed an incident which could’ve been nasty.
Be it a spinner or pacer, wearing a HELMET should be MANDATORY for batsmen at professional levels.
Request @icc to take this up on priority.https://t.co/7jErL3af0m
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
विजय शंकरचा तोच व्हिडीओ ट्विट करत सचिनने आयसीसीला विनंती केली आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “फास्टर बॉलर असो किंवा स्पिनर बॉलर असो, बॅट्समनला हेल्मेट किती महत्त्वाचं आहे, हेच या व्हीडिओतून दिसून येतं. माझी आयसीसीला विनंती आहे की हेल्मेट घालणं बॅट्समनला आपण अनिवार्य करायला हवं”.
आयसीसीबरोबरच मी जगभरातल्या सगळ्याच क्रिकेट बोर्डांना विनंती करतो की बॅट्समनला हेल्मेट घालावंच लागेल, यासाठीचा नियम आपण तातडीने करणं गरजेचं आहे. हेल्मेट अनिवार्य असणाऱ्या नियमाची आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करायला हवी, असं सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटलंय.
(Sachin Tendulkar Special Appeal From ICC)
संबंधित बातम्या
India Tour Australia | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो…
Photo : प्ले ऑफमध्ये एन्ट्री, मात्र सोशल मीडियावर ट्रोल, ट्विटरवर मीम्सची मेजवानी