Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच…” विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्य

वर्ल्डकप विजयासह सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटही गोड झाला. टीम इंडियाममध्ये तेव्हा 22 वर्षीय विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला होता. आता वर्ल्डकप विजयाबाबत विराट कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.

सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच... विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्य
"सचिन सहा वर्ल्डकप खेळला तेव्हा जिंकला, पण मी तर पहिल्या संधीतच..." विराट कोहलीचं आश्चर्यकारक वक्तव्यImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:40 PM

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षानंतर टीम इंडियानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं. 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्डकप संघात सचिन तेंडुलरकरसह विराट कोहली सुद्धा होता. वर्ल्डकप विजयासह सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटही गोड झाला. टीम इंडियाममध्ये तेव्हा 22 वर्षीय विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला होता. आता वर्ल्डकप विजयाबाबत विराट कोहलीने मोठं वक्तव्य करत सांगितलं की, “सचिन तेंडुलकरने 24 वर्षे देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांनी 6 वर्ल्डकप खेळल्यानंतर विजय मिळवला. मी तर पहिल्या संधीतच वर्ल्डकप जिंकला.” इतर खेळाडूंप्रमाणे सचिन तेंडुलकर विराट कोहलीचा आदर्श राहिला आहे. सचिनप्रमाणे विराटने फलंदाजीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. क्रिकेटमध्ये विराट कोहलीची रन मशिन म्हणून ख्याती आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. या मुलाखतीत त्याने वर्ल्डकप विजयाबाबतही सांगितलं. “मला त्या संघात स्थान मिळणं खरंच नशिबाचा भाग होता. पण संघात माझी निवड चांगल्या खेळावर झाली होती. पण निवडीबाबत मला तशी काहीच आशा नव्हती. पण जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या तेव्हा घडतात. मी जर चुकीचा ठरत नसेल तर 2011 मध्ये सचिन तेंडुलकर आपला सहावा वर्ल्डकप खेळत होता. तेव्हा मला पहिली संधी मिळाली होती आणि आम्ही जिंकलो होतो.”, असं विराट कोहलीने सांगितलं. त्यानंतर 2013 चॅम्पियन ट्रॉफी विजयी संघातही विराट कोहलीचा समावेश होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरंच राहिलं आहे.पण असं असूनही विराट कोहली निश्चिंत आहे.”मी माझा ट्रॉफी रुम भरलेला असावा यासाठी वेडा नाही. पण एक शिस्त असणं गरजेचं आहे.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून व्हाईट बॉल कारकिर्दही चांगली राहिली आहे. अयशस्वी कर्णधार म्हणून टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने आठवण करून दिली की, भारतीय संघात एक कल्चर निर्माण केल आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला भविष्यात नक्कीच होईल.

सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकप

2 एप्रिल 2011 रोजी सचिन तेंडुलकरचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. हा सचिन तेंडुलकरचा सहावा आणि शेवटचा वर्ल्डकप होता. या संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह आणि जहीर खान सारखे खेळाडू तिसरा वर्ल्डकप खेळत होते. तर गौतम गंभीर, एस श्रीसंत, सुरेश रैना, युसुफ पठाण आणि रविचंद्रन अश्विन आपला वनडे वर्ल्डक खेळत होते. या संघात विराट कोहली सर्वात तरुण खेळाडू होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.