धोनीला सचिन तेंडुलकरचा एक सल्ला
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा फिनिशर महेंद्रसिंह धोनीने लौकिकाला साजेसा खेळ केला. बऱ्याच दिवसांनी धोनीची बॅट तळपल्यानंतर, धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोनीने या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात सिक्सर ठोकून धोनीने भारताला ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला. धोनीच्या या खेळीनंतर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचं […]
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा फिनिशर महेंद्रसिंह धोनीने लौकिकाला साजेसा खेळ केला. बऱ्याच दिवसांनी धोनीची बॅट तळपल्यानंतर, धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोनीने या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात सिक्सर ठोकून धोनीने भारताला ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला. धोनीच्या या खेळीनंतर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी सचिनने धोनीला एक महत्त्वाचा सल्ला दिला. धोनीने एखाद्या शोच्या अँकरप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली भूमिका बजावावी, असं सचिनने म्हटलं आहे.
सचिन म्हणतो, “धोनीने उत्तम फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्याची लय हरपल्याचं जाणवलं. जिथे शॉट मारु इच्छित होता, तिथे त्याला मारता येत नव्हतं. हे कोणत्याही फलंदाजासोबत घडतं. मात्र दुसऱ्या वन डे सामन्यात तो काही वेगळ्याच विचाराने मैदानात उतरला होता. पहिल्याच चेंडूपासून तो वेगळीच फलंदाजी करत होता”
भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी धोनीने अनेकवेळा पूर्ण केली आहे. मात्र धोनीचा गेल्या काही दिवसातील फॉर्ममुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सचिन म्हणाला, “धोनी एक असा खेळाडू आहे, जो आधी काही चेंडू वाया जाऊ देतो. खेळपट्टी जाणून घेतो, गोलंदाजी समजून घेतो. त्यानंतर तो सामना शेवटपर्यंत घेऊन जाणं पसंत करतो. एका बाजूने खेळावर कंट्रोल ठेवण्याचं काम धोनी करतो”.
दुसरीकडे सचिनने दिनेश कार्तिकचंही फिनीशर म्हणून कौतुक केलं. कार्तिकने अंतिम षटकांमध्ये धोनीला उत्तम साथ दिली. कार्तिकबाबत सचिन म्हणतो, “धोनीसोबतच दिनेश कार्तिकनेही चांगली फलंदाजी केली. तो आला आणि सामना संपेपर्यंत मैदानावर उभा राहिला. दिनेशचं योगदान उत्तम होतं”.
याशिवाय सचिनने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या खेळीचीही स्तुती केली. तर मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांच्या एक-दोन सामन्यांच्या आधारे त्यांच्या करिअरबद्दल मत बनवू नका, असं आवाहनही चाहत्यांना केलं.
संबंधित बातम्या
श्वसनाचा त्रास झाला, तरीही धोनीने षटकार ठोकून सामना जिंकला!
लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना