सायना नेहवालचा पराभव, पती पारुपल्ली कश्यपचा संताप
सदोष अम्पायरिंगमुळे वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून फुलराणी सायना नेहवालला बाहेर पडावं लागलं, असा ठपका तिचा पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने ठेवला आहे.
नवी दिल्ली : भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालला (Saina Nehwal) बीडब्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. सायनाचा पराभव तिचा पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कश्यपने पंचांवर सदोष अम्पायरिंगचा ठपका ठेवला आहे.
बीडब्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत सायनाला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टकडून पराभवाचा सामना करावा लागला. एक तास 12 मिनिटं चाललेल्या सामन्यात सायना 15-21, 27-25, 21-12 अशा सेट्समध्ये पराभूत झाली. सायनाच्या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकला. त्याने ट्विटरवरुन आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.
‘पंचांची सुमार कामगिरी आणि असंख्य चुकीच्या निर्णयांमुळे दोन मॅच-पॉइंट्स गमवावे लागले. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रिव्ह्यू पद्धत नसणं आश्चर्यकारक आहे. आपला खेळ कधी चांगला होईल?’ अशा शब्दात पारुपल्ली कश्यपने चीड व्यक्त केली आहे.
2 match-points snatched away by bad umpiring . And numerous wrong decisions . Unbelievable that there are no reviews on other courts at the WORLD CHAMPIONSHIPS. When will our sport get better ? SICK @bwfmedia @HSBCBWF @NSaina #feelingcheated #totalbwfworldchampionships2019
— Parupalli Kashyap (@parupallik) August 23, 2019
कश्यपचा ट्वीट कोट करत सायनानेही आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. ‘दुसर्या गेममध्ये पंचांनी नियमबाह्य पद्धतीने दोन मॅच पॉइंट्सकडे दुर्लक्ष केलं, यावर अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. दुसऱ्या गेमच्या अर्ध्यावर “लाइन अंपायर्सना त्यांचं काम करु द्या” असं पंच म्हणाले. आणि अचानक पंचांनी असा निर्णय का घेतला, हे मला समजलंच नाही.’ असं सायनाने ट्विटरवर लिहिलं आहे.
still can’t believe 2 match points which the umpire overruled in the second game . And the umpire tells me in the mid of second game “let the line umpires do their job” and I dnt understand suddenly how the umpire overruled the match points..very sick @bwfmedia @HSBCBWF https://t.co/1p4PP4yXzc
— Saina Nehwal (@NSaina) August 23, 2019