Salman Butt : सलमान बट्टने भारतीय वेगवान गोलंदाजांची उडवली खिल्ली
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी समाधानकारक गोलंदाजी केलेली नाही.
आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) पराभूत केल्यापासून पाकिस्तानच्या (pakistan) माजी खेळाडू अनेकदा टीका करत असताना पाहायला मिळत आहे. आशिया चषकात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका टीमने चांगली कामगिरी केली यंदाच्या आशिया चषकावरती आपलं नाव कोरलं…सलमान बट्ट या पाकिस्तानच्या माजी खेळाडूने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगलीचं खिल्ली उडविली आहे.
पाकिस्तानचा फलंदाज सलमान बट्ट नेहमी विधाने करीत असतो. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आशिया चषकात खराब कामगिरी केल्यापासून त्यांच्यावरती अनेकांनी टीका केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी समाधानकारक गोलंदाजी केलेली नाही.
सलमानने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये तो म्हणतोय की, टीम इंडियाकडे तेज गोलंदाज नसल्यामुळे आमचे खेळाडू हेल्मेट सुद्धा घालत नाहीत.
सईद अनवर आमिर सोहैल या पाकिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या विरुद्ध खेळताना हेल्मेट घातलं नाही, तर त्यांनी टोपी घातली अशी खिल्ली उडविली आहे.