चौकार-षटकारांचा पाऊस, मॅच संपवूनचं परतला; ‘या’ खेळाडूकडून टीम इंडियाच्या बोलर्सची धुलाई

जयसूर्याच्या तडाखेबंद खेळीमुळं टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला होता. Sanath Jayasuriya Team India

चौकार-षटकारांचा पाऊस, मॅच संपवूनचं परतला; 'या' खेळाडूकडून टीम इंडियाच्या बोलर्सची धुलाई
सनथ जयसूर्या
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 11:31 AM

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) च्या विरोधात खेळताना जगभरातल्या नावाजलेल्या बॅटसमनना अवघड जात असलेलं पाहायला मिळतं. मात्र, असा एक फलंदाज आहे की जो टीम इंडियाच्या गोलंदाजासाठी बऱ्याचदा कर्दनकाळ ठरलेला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीनं ओपनिंगच्या बॅटिंगची गणितच बदलून टाकली. त्या बॅटसमननं आक्रमक फलंदाजीला नवीन ओळख दिली. त्या क्रिकेटपटूचं नाव सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) हे आहे. जयसूर्यानं टीम इंडियाच्या बोलर्सवर पेप्सी कपमधील मॅचमध्ये जोरदार आक्रमण केलं होतं. 1997 मधील तो 17 मेचा दिवस होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईत (Mumbai) मॅच होती. जयसूर्याच्या तडाखेबंद खेळीमुळं टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला होता. ( Sanath Jayasuriya century in Pepsi Cup match in Mumbai against team India on this day in 1997)

भारताकडून 226 धावांचं आव्हान

या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करत 7 विकेटवर 225 रन केल्या. टीम इंडियासाठी अजय जाडेजाने सर्वाधिक 72 रन, राहुल द्रविड़ने 61 आणि रॉबिन सिंहने 51 रन बनवल्या. यामुळं श्रीलंकेपुढे 226 धावांचं आव्हान होतं. त्यावेळी ही धावसंख्या देखील मोठी मानली जात होती. श्रीलंका बॅटिंगसाठी मैदानात उतरली आणि सनथ जयसूर्यानं टीम इंडियाच्या बोलिंगवर आक्रमण सुरु केलं. सनथ जयसूर्यानं एकट्यानं 151 रन काढल्या. 120 बॉलमध्ये जयसूर्याने 17 चौकार आणि 4 षटकार खेचत नाबाद राहात श्रीलंकेला विजय मिळवून दिला. श्रीलंकेनं हा सामना 40 व्या ओव्हरमध्येच जिंकला. जयसूर्याशिवाय श्रीलंकेच्या इतर बॅटसमननी 127 बॉलमध्ये केवळ 65 रन केल्या. त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूचा हा वनडेमधील सर्वाधिक स्कोर असायचा. पुन्हा एकदा 2000-01 मध्ये जयसूर्याने शारजाहमध्ये भारताविरोधात 189 रन केल्या.

जयसूर्याची कारकीर्द 110 टेस्‍ट, 445 वनडे

सनथ जयसूर्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखलं जातं. त्यानं श्रीलंकेसाठी 110 टेस्‍ट मॅचमध्ये 40.07 च्या सरासरीनं 6973 रन केल्या. यामध्ये 14 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यानावावर एक त्रिशतक देखील आहे. कसोटीमधील त्याचा सर्वाधिक स्कोअर 340 रन आहे. टेस्‍टमध्ये त्यानं 98 विकेट देखील घेतल्या आहेत. जयसूर्याने श्रीलंकेसाठी 445 वनडे मॅच खेळल्या. यामध्ये 32.36 सरासरीनं आणि 91.20 स्‍ट्राईक रेटने 13430 रन काढल्या. यामध्ये 28 शतक आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये जयसूर्याचा सर्वाधिक स्‍कोअर 189 रन आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 323 विकेट आहेत.

आईपीएलमधील कारकीर्द

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या तीन सीझनमध्ये सनथ जयसूर्यानं सहभाग घेतला. आईपीएल में जयसूर्या ने 2008 ते 2010 पर्यंत मुंबई इंडियन्स साठी 30 मॅच खेळल्या. यामध्ये 27.57 च्या सरासरीनं आणि 145.11 के स्‍ट्राइक रेटनं 772 रन केल्या. यामध्ये 114 रनसह एका शतकाचा समावेश आहे.सनथ जयसूर्यानं आयपीएलमध्ये चार चार अर्धशतक केली आहेत.

संबंधित बातम्या:

इंग्लंड दौऱ्यावर जायचंय? कोरोना चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक, अन्यथा निवड होऊनही डच्चू, BCCI चे कडक नियम

‘आपल्या प्रियजणांना जपा’, आईवडिलांचा कोरोनाविरोधात लढा, युजवेंद्र चहलची भावूक पोस्ट

(Sanath Jayasuriya century in Pepsi Cup match in Mumbai against team India on this day in 1997 )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.