बलात्काराचा आरोप असलेल्या आयपीएलमधील खेळाडूचा कहर, जामीन मिळताच केली अशी कामगिरी
पाटन उच्च न्यायालयाने 20 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर लामिछानेची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संदीप पुन्हा एकदा मैदानात उतरला. त्याने तुरुंगवासानंतर चार सामने खेळाला.
दिल्ली : आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीप लामिछाने याला नुकताच बलात्काराच्या आरोपातून जामीन मिळाला आहे. संदीपवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. पाटन उच्च न्यायालयाने 20 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर लामिछानेची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संदीप पुन्हा एकदा मैदानात उतरला. त्याने तुरुंगवासानंतर संदीप आतापर्यंत चार सामने खेळाला आहे. या चार सामन्यात प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला विजय मिळवता आला. नेपाळसाठी पहिला सामना 14 फेब्रुवारी 2023 रोजी खेळला. नामिबिया विरुद्धच्या सामन्यात त्याने 66 धावा देऊन 3 गडी बाद केले. या सामन्यात नेपाळचा 2 गडी राखून विजय झाला. दुसरा सामना स्कॉटलँड विरुद्ध 17 फेब्रुवारीला खेळला. या सामन्यात त्याने 27 धावा देत 3 गडी बाद केले. या सामन्यात तीन गडी राखून विजय मिळाला. तिसरा सामना 18 फेब्रुवारीला तिसरा सामना खेळला. या सामन्यात 46 धावा देऊन 3 गडी बाद टिपले. या सामन्यात नेपाळने 3 गडी राखूनच विजय मिळवला. चौथ्या सामन्यातही लामिछानेनं 10 षटकात 45 धावा देऊन 4 गडी बाद केले.
कधी झाली होती अटक?
8 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळच्या न्यायालयाने इंटरनॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन संदीप लामिछानेच्या अटकेच वॉरंट जारी केलं होतं. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काठमांडू येथील हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लामिछानेला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. पीडित अल्पवयीन मुलीने पाच सप्टेंबरला पोलीस ठाण्यात संदीप लामिछानेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती.
लामिछाने आणि वाद
स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात नेपाळने तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर स्कॉटलँडच्याा खेळाडूंनी संदिप लामिछानेला हात मिळवण्यास नकार दिला. पण इतर खेळाडूंशी मात्र हस्तांदोलन केलं. लामिछानेच्या पुनरागमनावर सध्यातरी आयसीसीने काहीच वक्तव्य केलं नाही. दुसरीकडे, स्कॉटलँड संघाच्या कृतीमुळे संदीप चर्चेचा विषय ठरला आहे.
आयपीएलमध्ये कुठल्या टीमकडून खेळला?
दुसरीकडे, चौकशीच्या प्रत्येक टप्प्यात पूर्ण सहकार्य करीन. स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन, असं लामिछानने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. संदीप लामिछानेला अटक झाली. अंतिम आदेश येईपर्यंत संदीप लामिछानेला देशाबाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. लेग स्पिनर संदीप लामिछाने नेपाळचा सर्वात मोठा हाफ प्रोफाइल क्रिकेटर आहे.इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा तो पहिला क्रिकेटर आहे. 2018 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून डेब्यु केला होता.