सचिन तेंडुलकरच्या आयुष्याचं अर्धशतक, ‘या’ गावानं केलेला वाढदिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. ठिकठिकाणी सचिनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतांना एका गावाने केलेले सेलिब्रेशन भन्नाट असून चर्चेचा विषय ठरत आहे.

सचिन तेंडुलकरच्या आयुष्याचं अर्धशतक, 'या' गावानं केलेला वाढदिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 10:45 AM

सांगली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सचिनवर प्रेम करणारे वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न करत असतात. मात्र, सगळीकडे साजरा होणारा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आणि महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आगळावेगळा आहे. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस म्हणजे सांगलीतील औंढी गावासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाहीत. मराठी नववर्षाचे स्वागत ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते अगदी तशाच स्वरूपात सचिन तेंडुलकरचा वाढदिवस साजरा केला जात आहे. सचिन तेंडुलकरने वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यानं सांगलीत औंढी गावाने केलेलं सेलिब्रेशन एखाद्या सणापेक्षा नक्कीच कमी नाही.

क्रिकेटचा देव म्हणून संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरला सोशल मीडियासह विविध माध्यमातून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या जात असतांना सांगालीतील औंढी गावात केलेले सेलिब्रेशन आगळेवेगळे आहेत.

सांगली गावात घराघराला गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. गुढीला बॅट देखील लावण्यात आली आहे. गुढी हार फुलांनी सजविण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरात सचिन तेंडुलकरचा छोटासा पुतळा तयार करून दिंडीही काढण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगलीच्या औंढी गावात गुढीपाडवा सण साजरा करत असतांना असलेला आनंद जल्लोष अगदी तसंच सर्वत्र पाहायला मिळत आहे. खरंतर जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले ही या कार्यक्रमाला उपस्थित आहे.

विशेष म्हणजे ज्या गावात हा सर्व उत्साह आहे. त्याच गावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर काढण्यात आलेल्या तेंडल्या चित्रपटाचे शूटिंग याच गावात पार पडले आहे. सचिन तेंडुलकरवर या गावच्या नागरिकांचे विशेष प्रेम आहे.

ठिकठिकाणी सचिन तेंडुलकरचा वाढदिवस साजरा केला जात असतांना काही ठिकाणी आठवणी शेयर केल्या जात आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे वयाचे अर्धशतक पूर्ण केल्याने अनोख्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न असतांना सांगलीतील औंढी गावात झालेले सेलिब्रेशन भन्नाट आहे.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस म्हणजे या गावाने साजरा केलेला एक सण असून त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. संपूर्ण गाव या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाले आहे. गुढ्या, दिंडी, जल्लोष, घरात गोडधोड जेवण असं बरंच काही असल्याने सचिन तेंडुलकरचा वाढदिवस गावात एखादा सण साजरा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसल्याचे यातून दिसून येत आहे. या गावाने दिलेल्या शुभेच्छा भन्नाट असल्याने सोशल मीडियासह राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.