सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला…घटस्फोटाचं काय आहे कारण ?
शोएब आणि सानिया यांचा विवाह 12 एप्रिल 2010 मध्ये हैदराबाद येथे कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थित झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला होता त्याचे नाव इजहान असे ठेवण्यात आले आहे.
मुंबई : कधीकाळी भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपट्टू शोएब मलिक यांचं प्रेमप्रकरण चर्चेत होतं. त्याचं कारण ही अगदी तसंच होतं. त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने या जोडीची खास चर्चा व्हायची. आता याच जोडीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याचं कारण ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसेल असेच आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट निश्चित मानला जात आहे. याबाबत शोएब मलिकच्याच एका मित्राने खुलासा केल्याने क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही बऱ्याच काळापासून विभक्त राहत आहे. त्यात शोएबने सानियाला धोका दिल्याची चर्चा आहे. शोएब पाकिस्तान मधील एका तरुणीला काही दिवसांपासून डेट करत असल्याची पाकिस्तानात चर्चा देखील आहे. शोएब मलिक हा पाकिस्तान मध्ये राहत असून टी 20 संदर्भात तो काम करत आहे. तर सानिया ही दुबई मध्ये आपल्या मुलासह राहत असून लवकरच शोएब आणि सानियाचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आणि आता भारतात होऊ लागली आहे.
काही महिन्यांपासून सानिया आणि शोएब यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला अआहे. ज्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आणि भारतात होत होत्या, त्यावर आता शिक्का मोर्तब झाला असून लवकरच हे दोघे कायदेशीर बाबींची पूर्तता करून विभक्त होणार आहे.
याबाबत शोएब मलिक यांच्या एका अत्यंत जवळच्या मित्राने याबाबत स्पष्ट केलं आहे. लवकरच हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यात सानिया हिने दुबईत आपल्या मुलासोबतचा फोटो शेयर करत एक भावुक पोस्ट केली होती.
12 वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपट्टू यांची लव्ह स्टोरी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. दोघांनी लग्न केल्यावर त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला होता.
शोएब आणि सानिया यांचा तब्बल 12 वर्षांचा सुखी संसार मोडणार असून त्याचे कारण शोएब मलिकचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये होत असून त्यावर अद्याप शिक्का मोर्तब झाला नाही.
View this post on Instagram
शोएब आणि सानिया यांचा विवाह 12 एप्रिल 2010 मध्ये हैदराबाद येथे कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थित झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला होता त्याचे नाव इजहान असे ठेवण्यात आले आहे.
इजहानला घेऊन सानिया मिर्झा दुबईत सध्या राहत असून शोएब मलिक पाकिस्तानमध्ये राहत असून त्याचे एका तरुणीसोबत असलेले प्रेमप्रकरण त्यांच्या संसाराला कारणीभूत तर ठरलं नाही ना ? अशी शंका आता नेटकरी घेऊ लागले आहेत.