Sania Mirza | शोएब मलिकने तिचं ऐकायला हवं होतं.. सानिया मिर्झा लग्नाबद्दल काय म्हणाली ?

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यातील नाते संपले आहे. दोघांनी घटस्फोट घेतला असून त्यांचं 13 वर्षांपूर्वीचं जुनं नातं तोडलं आहे. तर शोएब मलिकने सना जावेदशी तिसरं लग्नही केलं. घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती लग्नाबद्दल बोलत आहे.

Sania Mirza | शोएब मलिकने तिचं ऐकायला हवं होतं.. सानिया मिर्झा लग्नाबद्दल काय म्हणाली ?
| Updated on: Feb 02, 2024 | 9:42 AM

Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचं वैयक्तिक आयुष्य सध्या खूप चर्चेत आहे. सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला असून त्यांचं 13 वर्षांपूर्वीचं जुनं नातं मोडलं आहे. एवढंच नव्हे तर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरं लग्नही केलं. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो येताच एकच खळबळ माजली. सानिया आणि शोएबच्या मतभेदाच्या, घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच काळ येत होत्या, पण त्यांनी त्यावर काहीच भाष्य केले नव्हते. पण 41 व्या वर्षी शोएबने तिसरं लग्न केलं आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर सानिया- शोएबचा घटस्फोट खूप आधीच झाल्याचं समोर आलं.

लग्नाबद्दल काय म्हणाली सानिया  ? 

त्यानंतरही सोशल मीडियावर त्यांच्या दोघांबद्दल बरीच चर्चा सुरू होती. अनेकांनी शोएब मलिकला बरंच ट्रोलही केलं. आता त्यातच सानिया मिर्झाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. खरंतर, X (पूर्वीचं ट्विटर) वर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सानिया मिर्झा लग्नाबद्दल बोलली होती. खरंतर तिला लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. ‘ नव्या जोडप्यांना तू काय सल्ला देशील ? ‘ असं सानियाला विचारण्यात आलं होतं. ‘(तुम्ही) जसे आहात, तसेच रहा. स्वत:ला अजिबात बदलू नका. कारण तुम्ही जसे आहात, तुम्ही (समोरच्याला) तसेच आवडला होतात, ‘ असं उत्तर त्यावर सानियाने दिलं होतं.


खरंतर हा व्हिडीओ जुना आहे पण सध्या तो पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेक लोकांनी सानियाचं कौतुक केलं आहे. तसेच अनेकांनी तिच्याशी सहमतीही दर्शवली आहे. कारण सानिया स्वत:देखील लग्नानंतर बदलली नाही, ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजाबद्दल ओळखली जाते. सानिया मिर्झा ही भारतातील टॉप रोल मॉडेल्समध्ये गणली जाते.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 2010 साली त्यांनी लग्न केलं, पण अखेर 13 वर्षांचं त्यांचं नातं संपुष्टात आलं. दोघांना एक मुलगा आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले, त्यानंतर सानिया आणि शोएब यांच्यात घटस्फोटाची बातमी समोर आली. सानियाने स्वत:च्या इच्छेने संबंध संपवल्याचे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं.