अखेर मनातलं ओठांवर आलं तर; सानिया मिर्झाला या व्यक्तिला डेट करायचं आहे

भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झाची एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून तिच्या मनातील एका खास व्यक्तिची झलक पाहायला मिळाली. शिवाय तिने या व्यक्तीसोबत रोज डेटींगला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोण आहे ही खास व्यक्ती?

अखेर मनातलं ओठांवर आलं तर; सानिया मिर्झाला या व्यक्तिला डेट करायचं आहे
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 4:18 PM

बॉलिवूडमधील जशी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा फार रंगते तशाच चर्चा स्पोर्टमधील खेळाडूंच्या खासगी आयुष्याबद्दी अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळते. यातच आता भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झाबद्दलही सध्या एक चर्चा तुफान व्हायरल होत आहे ती म्हणजे तिच्या डेटींगची.

घटस्फोटानंतर सानियाच्या डेटींगची चर्चा 

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात मोठा बदल झाला. सानियाला डिप्रेशनला सामोरं जावं लागलं असल्याचंही म्हटलं जातं. मात्र, ती या धक्क्यातून बाहेर आली.

घटस्फोटानंतर अनेकदा तिचं नाव स्टार खेळाडूंसोबत जोडलं जातं होतं. जसं की सानिया मिर्झा आणि स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांचं नाव नेटकऱ्यांनी जोडलं होतं. पण सानियाने यावर कोणतही भाष्य करणं टाळलं आहे.

सोनियाची इन्टाग्राम स्टोरी तुफान व्हायरल

सोनियाच्या एका इन्टाग्राम स्टोरी तुफान व्हायरल झाली आहे. सानिया मिर्झा सोशल मीडियावर अॅक्टिव असते. सानिया मिर्झाने इंस्टाग्रामवर तिच्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

एवढच नाही तर त्या व्यक्तिसोबत सतत डेटवर जायला आवडेलं असही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सानिया मिर्झाच्या मनात कोण आहे? याबाबत अनेक प्रश्न विचारले जात असतानाच तिची ही पोस्ट व्हायरल झाली.

सानियाच्या पोस्टमध्ये त्या खास व्यक्तीचं कौतुक

खरंतर ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून फराह खान आहे. 9 जानेवारीला फराहचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सानियाने तिच्याबद्दल ही पोस्ट लिहिली होती. सानियाने या पोस्टमध्ये फराह खानचं कौतूक केलं अन् प्रत्येक वेळी तिच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली.

सानिया मिर्झाने फराह खानसोबतचा फोटो देखील पोस्ट केला होता. सध्या सानिया दुबईमध्ये आपल्या लेकासह वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. सध्या तरी ती सिंगल असल्याचंच बोललं जात आहे.तसेच सानिया दुबईमध्ये तिच्या लेकासोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी पोस्ट करत असते.

दरम्यान सानियाची मुलाबद्दलची एक पोस्ट फार चर्चेत आली होती ती म्हणाली होती “बऱ्याच वेळा मुलांचे संगोपन करताना डोक्यावर जास्त जोर पडतो. पण तुम्हाला तुमचा आत्मा मिळतो.” अशी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सानियाने बरंच काही लिहिले होते. सानिया मिर्झा या पोस्टमध्ये खूप जास्त भावूक झाल्याचंही दिसत होतं. सानिया मिर्झा तिच्या मुलाचे संगोपन एकटीच करते. सानिया मिर्झाचा मुलगा पाच वर्षांचा आहे.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.