IPL 2025 : प्रीती झिंटाच्या टीममध्ये जाणार रोहित शर्मा ? फक्त एक अट..

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून रोहित शर्मा याची मागणी वाढली आहे.आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स टीमने त्याच्यासाठी 50-50 कोटी वाचवून ठेवल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. मात्र याच सर्व चर्चांदरम्यान प्रीति झिंटाच्या पंजाब टीमने रोहित शर्माला खरेदी करण्याची हिंट दिली आहे.

IPL 2025 : प्रीती झिंटाच्या टीममध्ये जाणार रोहित शर्मा ? फक्त एक अट..
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 2:24 PM

आयपीएलचं मेगा ऑक्शन आता जवळ आलं आहे. मात्र त्यापूर्वीच रोहित शर्माबद्दलच्या चर्चा वेगाने सुरू आहेत. टी20 वर्ल्ड कपपासून तर त्याची डिमांड खूपच वाढली आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स टीमने त्याच्यासाठी 50-50 कोटी वाचवून ठेवल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. तर मागच्या सीझनमध्ये रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये जाणार असल्याच्या अफवाही वेगाने पसरल्या होत्या. मात्र आता याच सर्व चर्चांदरम्यान प्रीति झिंटाच्या पंजाब टीमने रोहित शर्माला खरेदी करण्याची हिंट दिली आहे. पण त्यासाठी केवळ एकच अट आहे.

प्रीती झिंटाच्या टीममध्ये जाणार रोहित शर्मा ?

प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जला गेल्या दहा सीझनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचता आलेले नाही. तिच्या संघाची कामगिरी सातत्याने खराब राहिली आहे. गेल्या मोसमात तिने आपल्या संघात चांगल्या खेळाडूंची कमतरता नाही, फक्त एका लीडरची गरज असल्याचे विधान केले होते. यावरून तिची टीम एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. अशा परिस्थितीत प्रिती झिंटाला नक्कीच त्याला विकत घ्यायची इच्छा असेल , पण त्यासाठी रोहितला ऑक्शनमध्ये यावे लागेल. आणि दुसरी अट म्हणजे पंजाब किंग्सकडे त्याला संघात घेण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत. पंजाब किंग्जचे  हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट संजय बांगर यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये रोहित शर्माचा आपल्या संघात समावेश करण्याचे संकेत दिले. जर रोहित लिलावात आला तर त्याची बोली नक्कीच खूप जास्त असेल, असे ते म्हणाले. तो जर ऑक्शनमध्ये उतरला तर तेव्हा त्या फ्रँचायझीकडे तितके पैसे वाचतील की नाही हेही पहावे लागेल.

रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघ 5 वेळा ठरला विजयी

रोहित शर्मा कर्णधार असताना मुंबई इंडियन्सचा संघ 5 वेळा ट्रॉफी जिंकला आहे. मात्र त्यानंतरही फ्रँजायझीने गेल्या वर्षी त्याला कर्णधारपदावरून हटवलं होतं. त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याला टीममध्ये घेऊन कर्णधार पड त्याच्याकडे सोपवण्यात आलं. मात्र त्यानंतर संघात बरीच फूट पडल्याची चर्चा होती. रोहित आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई संघ रोहितला रिटेन करणार नसून तो अन्य एखाद्या संघात सामील होऊ शकतो, असेही समोर आले आहे. रोहित शर्माचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहभागी होण्याबाबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या दाव्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. आता रोहितबाबत मुंबईचा संघ काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.