संजय मांजरेकर यांचा विराटला खास सल्ला, म्हणाले, ‘बाहेरच्या गोष्टींवर बोलताना जरा सांभाळून…’
भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. Sanjay manjarekar suggestion Virat kohli
पुणे : भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर (Sanjay manjarekar) यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) खास सल्ला दिला आहे. लोकांच्या टीकेवर किंवा चर्चांवर बाहेरच्या गोष्टींवर थोडंस शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर किंवा याच्यापासून शक्य होईल तेवढं लांब रहा, असा सल्ला मांजरेकर यांनी विराटला दिला आहे. (Sanjay manjarekar suggestion Indian Captain Virat kohli)
काय म्हणाले संजय मांजरेकर?
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत के.एल. राहुल वरच्या टीकेसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर विराटने बाहेरच्या फालतू गोष्टी, असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय मांजरेकर यांनी ट्विट करुन विराटला खास सल्ला दिला आहे. अशा बाहेरच्या गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर, असं मांजरेकरांनी सांगितलं आहे.
त्याचवेळी मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं क्रिकेटविषयीचं तसंच खेळाडूंविषयीचं मत महत्त्वाचं आहे, हे ही मान्य केलंय. तसंच क्रिकेट रसिकांच्या मतांना सन्मान दिला पाहिजे, असंही ते म्हणाले. विराट ज्या गोष्टींना फालतूच्या गोष्टी म्हणाला खरं तर त्या गोष्टी एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीविषयी होत्या. त्यामुळे अशा गोष्टींवर बोलताना थोडीशी काळजी घ्यायला हवी, असं मांजरेकर म्हणाले.
Outside talk which Virat calls nonsense is basically public reacting to a public performance. And it’s always been the same- Praise when you do well, critique when you don’t. Virat must learn to accept this age old reality with calmness & maturity. Just like Dhoni did.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 23, 2021
विराटला सल्ला देताना मांजरेकरांना धोनीची आठवण
मांजरेकर यांनी विराटला सल्ला देताना महेंद्र सिंग धोनीची आठवण काढली आहे. मांजरेकर म्हणाले, विराटने वस्तुस्थितीचा संयम आणि परिपक्वतेने स्वीकार करायला हवा, जसा धोनीने केला होता.
‘बाहर की फालतू की बातें’, विराटच्या शब्दप्रयोगावर मांजरेकरांचा सल्ला
भारताने पाहुण्या इंग्लंडला 5 टी ट्वेन्टी (india Vs england T20) सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने हरवलं. परंतु या मालिकेत धडाकेबाज फलंदाज के.एल. राहुलच्या (KL Rahul) बॅटचा जलवा काही दिसला नाही. या मालिकेत त्याचा फ्लॉप परफॉरमन्स पाहायला मिळाला. त्याच्या बॅटिंगवर अनेक दिग्गजांनी तसंच क्रिकेट रसिकांनीही टीका केली. याच टीकाकारांना उत्तर देताना विराट चिडलेला पाहायला मिळाला. ‘बाहर की फालतू की बातें’, असा शब्दप्रयोग त्याने केला. याच शब्दप्रयोगावरुन मांजरेकरांनी विराटला सल्ला दिलाय.
? “We will continue backing our players.” #TeamIndia captain @imVkohli stresses the importance of keeping the players in good mental space. #INDvENG @Paytm pic.twitter.com/qy7AqmrW6O
— BCCI (@BCCI) March 22, 2021
Ind Vs Eng : पुण्यात पहिला एकदिवसीय सामना, हे 4 धुरंधर टीम इंडियाची बाजी पलटवू शकतात!
Rohit Sharma : वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा सज्ज