‘बापाचा पैसा उडवतेस’ म्हणणाऱ्या महिलेला सचिनची लेक सारा तेंडुलकरचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाली…
साराने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवलेल्या एका फोटोवरुन एका महिला फॅन्सने तिला डिवचलं असता साराने तिला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Sara tendulkar reply female users Wasting Father Sachin money)
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar Daughter ) लेक सारा तेंडुलकर (Sara tendulkar) सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांना स्वत:बद्दलची माहिती देत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवलेल्या एका फोटोवरुन एका महिला फॅन्सने तिला डिवचलं असता साराने सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Sara tendulkar reply female users Wasting Father Sachin money)
महिला फॅन्सकडून ट्रोल करण्याचा प्रयत्न
सारा तेंडुलकरने 16 एप्रिलला गाडीत कॉफी पीत असल्याचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला. ब्लू टोकाई कॉफी, आयुष्याला वाचवते, असं म्हणत साराने तो फोटो इन्स्टाला शेअर केला. साहजिक तिच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झाला. पण यात एका महिला फॅन्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. बापाचा पैसा उडवतेस, अशी एक कमेंट तिच्या महिला फॅन्सने तिच्या फोटोवर केली.
साराने दिलं प्रत्युत्तर
महिला फॅन्स ट्रोल करत असल्याचं लक्षात आल्यानंतर साराने तिच्या कमेन्टचा स्क्रीन शॉट काढत तिला खास रिप्लाय दिला. “कॅफीनवर खर्च झालेला पैसा तो वायपट नाही तर त्याचा योग्य वापर आहे”, एवढ्याच एका ओळीत साराने महिला ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
महिलेकडून अर्जुन तेंडुलकरही ट्रोल
खास गोष्ट ही देखील आहे की साराच्या कॉफीवरुन ज्या महिलेने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तिनेच साराचा भाऊ अर्जुनलाही ट्रोल केलं. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्यावर महिलेने त्याला ट्रोल करताना ‘सर्वांत स्वस्त मुलगा’ असं लिहिलं होतं.
कोण आहे सारा तेंडुलकर?
भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकरची सारा ही लेक आहे. मुंबईत जन्मलेल्या साराने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन (UCL) येथून मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. सारा तेंडुलकरचं नाव जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या स्टार किड्सच्या यादीत येतं. आपल्या शिक्षणानंतर ती आता आपल्या करिअरलाही सुरुवात करण्याची तयारी करत आहे.
साराचं नाव क्रिकेटच्या एका लोकप्रिय टूर्नामेंट ‘सहारा कप’वरुन ठेवण्यात आलं आहे. ही पहिली अशी मालिका आहे जी सचिनने 1997 मध्ये कप्तान म्हणून पहिल्यांदा जिंकली.
(Sara tendulkar reply female users Wasting Father Sachin money)
हे ही वाचा :
आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!
IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!