फलंदाजी करत असलेला धोनी स्वतःच बांगलादेशचीही फिल्डिंग लावतो तेव्हा…

कार्डिफ, इंग्लंड : विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. के एल राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर भारताने हा सोपा विजय मिळवला. या सामन्यात धोनीने केवळ 78 चेंडूत घणाघाती 113 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 50 षटकात 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान बांगलादेशला […]

फलंदाजी करत असलेला धोनी स्वतःच बांगलादेशचीही फिल्डिंग लावतो तेव्हा...
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 4:11 PM

कार्डिफ, इंग्लंड : विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. के एल राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर भारताने हा सोपा विजय मिळवला. या सामन्यात धोनीने केवळ 78 चेंडूत घणाघाती 113 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 50 षटकात 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. बांगलादेशचा डाव 49.3 षटकात 264 धावांत आटोपला.

धोनी यष्टीरक्षण करताना असो किंवा फलंदाजी करताना, त्याच्या कर्णधार नेहमीच जागा असतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीतला वेगळाच गुण पाहायला मिळाला. धोनी फलंदाज करत असताना त्याने चक्क बांगलादेशचीही फिल्डिंग लावण्यास मदत केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सराव सामन्यातील 40 व्या षटकात शब्बीर गोलंदाजी करत होता. 60 धावांवर असलेल्या धोनीने शब्बीरला थांबवलं आणि सूचना केली. शब्बीरने रनअप घेतला, पण चेंडू फेकण्यापूर्वीच त्याला थांबावं लागलं. धोनी स्टम्पच्या बाजूला झाला आणि एका खेळाडूला योग्य जागी लावण्याची सूचना गोलंदाजाला केली. धोनीने बांगलादेशच्या फिल्डरला मिड विकेट स्क्वेअर लेगला जाण्यासाठी सांगितलं. हे अभूतपूर्व चित्र पाहून समालोचकांनाही हसू आवरलं नाही. शिवाय शब्बीरनेही धोनीचे आभार मानले.

VIDEO :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.