WORLD CUP 1996 | प्रेक्षक मैदानात बॉटल फेकत होते,आणि विनोद कांबळी ग्राऊंडवर रडत होता, कारण
त्यावेळी मॅचची अशी परिस्थिती होती की, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 15.5 ओव्हरमध्ये 132 धावा पाहिजे होत्या.
मुंबई : 13 मार्च 1996 ला टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यात ईडन गार्डनमध्ये सेमीफायनलची मॅच सुरु होती. त्यावेळी टीम इंडियाचा स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी टीम इंडियाला जिंकण्यासाठी 252 धावांची गरज होती. परंतु 34.1 ओव्हरमध्ये 120 धावा टीम इंडियाच्या झाल्या होत्या. मैदानात विनोद कांबळी (Vinod Kambli) 10 धावांवर खेळत होता. टीम इंडियाचा पराभव होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं चाहते संतप्त झाले होते. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना सुरक्षेच्या कारणास्तव तिथून तात्काळ बाहेर नेण्यात आलं होतं. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव केला होता. त्यावेळी विनोद कांबळीच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले होते.
मोहम्मद अजहरुद्दीन हा त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जवागल श्रीनाथ या गोलंदाजाने सुरुवातीला सनथ जयसुर्या, रमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिन्हे, या श्रीलंकेच्या महत्त्वाच्या खेळाडूंना बाद केले होते. अरविंद डिसिल्वा आणि रोशन महानामा यांनी दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे श्रीलंका टीमची धावसंख्या 251 झाली होती.
त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली. नवजोत सिंह सिद्धू हा तीन धावा काढून बाद झाला. त्याच्यानंतर सचिन तेंडूलकर आणि संजय मांजरेकर या दोन फलंदाजांनी 90 धावांची भागीदारी केली. सचिनची 65 धावांवर खेळत असताना बाद झाला. त्यानंतर मॅच पुर्णपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकली. कारण 22 धावात टीम इंडियाचे पाच फलंदाज बाद झाले.
त्यावेळी मॅचची अशी परिस्थिती होती की, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 15.5 ओव्हरमध्ये 132 धावा पाहिजे होत्या. टीम इंडियाकडे फक्त दोन विकेट बाकी होत्या. टीम इंडिया मॅच जिंकणार नाही हे चाहत्यांच्या लक्षात आल्याने चाहत्यांनी खु्र्च्या मोडायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर पाण्याच्या बॉटल सुद्धा मैदानात फेकल्या होत्या. मैदानातील परिस्थिती इतकी भयानक होती की, दोन्ही टीमला पॅव्हेलियनमध्ये बोलवण्यात आलं होतं. काहीवेळाने पुन्हा मॅच सुरु झाली. पण आक्रमक प्रेक्षक पाहून श्रीलंका टीमचा विजय घोषित करण्यात आला होता.
त्यावेळी विनोद कांबळीला तो पराभव एकदम जिव्हारी लागला होता. आपला पराभव झालाय यावर कांबळीचा विश्वास नव्हता. आजही ती मॅच पाहताना कांबळीला रडायला येतं असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर टीममधील एका जरी खेळाडूने मला त्यावेळी साथ दिली असती तरी मी तो सामना जिंकवला असा असंही विधान विनोद कांबळी याने केलं आहे.