भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या लेडी सेहवागलाही ‘इतक्या’ कोटींची बोली

वुमन्स प्रिमिअर लीगचा लिलाव पार पडला यामध्ये भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला सर्वाधिक बोली लागली. त्यापाठोपाठ भारताच्या लेडी सेहवागलाही मोठी बोली लागली आहे.

भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या लेडी सेहवागलाही 'इतक्या' कोटींची बोली
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:29 PM

मुंबई : वुमन्स प्रिमिअर लीगचा लिलाव पार पडला यामध्ये भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला सर्वाधिक बोली लागली. भारतीय महिला संघातील स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, शफाली वर्मा या महत्त्वाच्या खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे या खेळाडूंना करोडोंची बोली लागली. फेंचायसींमध्ये महत्त्वाचे खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चांगली रस्सीखेच पाहायला मिळाली. भारताच्या लेडी सेहवागलाही मोठी बोली लागली. शफाली वर्माला 2 कोटी रूपयांची बोली लागली आहे.

शफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. आताच पार पडलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शफाली वर्माने भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवत वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला. शफालीने क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक आक्रमक फलंदाज आणि कोणत्याही बॉलरवर तुटून पडणाऱ्या शफालीने सलामीवीर भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे.

2021 साली झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. त्यावेळी शफाली वर्माने ग्रुप स्टेजमधील सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भारतीय संघाचा अंतिम सामन्यामध्ये पराभव झाल्यावर शफाली ढसाढसा रडलेली होती. मात्र तिने आता अंडर-19 वर्ल्ड कप जिंकत आपलं एक स्वप्न पूर्ण केलं. भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देण्याची संघाला आता संधी असून शफाली सलामावीर म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावताना दिसत आहे.

शफाली वर्माने आतापर्यंत 52 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 24.78 च्या सरासरीने 1264 धावा केल्या आहेत. 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय शफालीने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 531 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

स्मृती मंधाना सर्वाधिक बोली

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात वुमन्स प्रिमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 3.40 कोटींची बोली लावत स्मृती मंधानाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांच्या फ्रेंचायसींमध्ये स्मृतीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर आरसीबीने यामध्ये बाजी मारली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं. ऋचा घोषची बेस प्राइस 50 लाख रुपये होती. बेस प्राइसपेक्षा तिला चारपट जास्त पैसे मिळालेत. ऋचा घोषला  WPL मध्ये 1.90 कोटी रूपये मिळालेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.