Video: बाबर आणि रिजवानला एकाचवेळी मिठी मारुन उचललं, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात…
आज टीम इंडियाची आणि इंग्लंडची मॅच एडिलेडच्या मैदानात होणार आहे.
सिडनी : सिडनीच्या मैदानावर (Sydney) काल पाकिस्तान आणि न्यूझिलंड (PAK vs NZ) यांच्यात मॅच झाली. त्यामध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे न्यूझिलंड टीमचा पराभव झाला. तसेच पाकिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातीला चांगली खेळी केली त्यामुळे पाकिस्तान टीमने एकहाती विजय मिळविला. पाकिस्तान टीम फायनलमध्ये (Final) पोहोचल्यानंतर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.
कालच्या सेमीफायनलच्या पहिल्या मॅचमध्ये न्यूझिलंडच्या टीमने सुरुवातीला फलंदाजी केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली, त्यामुळे न्यूझिलंड टीमची धावसंख्या 152 झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवान या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी केली. कालच्या विजयानंतर पाकिस्तानच्या टीमचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
कालची मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष साजरा केला. पाकिस्तान टीमचा महत्त्वाचा गोलंदाज शाहीन आफ्रीदी याने बाबर आणि रिजवानला मिठीमारुन उचलून घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले आहेत.
View this post on Instagram
आज टीम इंडियाची आणि इंग्लंडची मॅच एडिलेडच्या मैदानात होणार आहे. आजच्या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ती टीम फायनलसाठी पात्र असेल. त्यामुळे एडिलेडच्या मैदानात दुपारी दीडवाजल्यापासून दोन्ही टीममधील महामुकाबला पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड टीम
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.