Shane Warne : शेन वॉर्नची टोपी इतक्या कोटीला विकली, आजही चर्चा
ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळताना शेन वॉर्न याचा एकेकाळी मोठा दबदबा होता.
दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे (Shane Warn) थायलंडमध्ये (Tailand) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 4 मार्च रोजी अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याचे काही मित्र होते. आठ दिवसानंतर वॉर्नचा मृतदेह ऑस्टेलियात दाखल झाला होता. त्यावेळी त्याचे कुटुंबीय सीडनी विमानतळावरती अधिक भावूक झाले होते.
आज शेन वॉर्न याचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आज त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. वॉर्नने क्रिकेट खेळत असताना अनेक महत्त्वाच्या मॅच त्यांच्या गोलंदाजीमुळे जिंकून दिल्या आहेत. त्यांच्या नावावर सुद्धा अनेक रेकॉर्ड आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळताना शेन वॉर्न याचा एकेकाळी मोठा दबदबा होता. त्यावेळी शेन वॉर्नने रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे त्याला देशभरात लोकप्रियता अधिक मिळाली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया टीमला सुद्धा त्याचा वेळोवेळी फायदा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाला भीषण आगीच्या दुर्घटनेचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत वॉर्न आपल्या देशाच्या मदतीसाठी पुढे आला. पीडितांना मदत करण्यासाठी त्याने आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव केला. त्याची टोपी लिलावात सुमारे 5 कोटी रुपयांना विकली गेली. वॉर्नने लिलावाची संपूर्ण रक्कम आग ग्रस्तांच्या मदतीसाठी दान केली. महत्त्वाची बाब म्हणजे याआधी माजी महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांची कॅप 3 कोटी 6 लाख रुपयांना विकली गेली होती. जानेवारी 2003 मध्ये त्याचा लिलाव झाला होता.