सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, शॉन मार्श विश्वचषकातून बाहेर

शॉन मार्शच्या जागी आता विकेटकीपर फलंदाज पीटर हँड्सकॉम्बचा समावेश करण्यात आलाय. 4 जुलैला सराव करत असताना चेंडू लागून शॉन मार्शला दुखापत झाली. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली.

सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, शॉन मार्श विश्वचषकातून बाहेर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:09 PM

World Cup 2019 : सेमीफायनलपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय. संघातील अनुभवी फलंदाज शॉन मार्श दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. शॉन मार्शच्या जागी आता विकेटकीपर फलंदाज पीटर हँड्सकॉम्बचा समावेश करण्यात आलाय. 4 जुलैला सराव करत असताना चेंडू लागून शॉन मार्शला दुखापत झाली. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी शॉन मार्शच्या दुखापतीबाबत माहिती दिली. शॉन बाहेर जाणं ही संघासाठी निश्चितच चांगली बाब नाही. संपूर्ण विश्वचषकात शॉनचा संघाला मोठा फायदा झालाय, असंही लँगर म्हणाले. शिवाय शॉन मार्शच्या जागी पीटर हँड्सकॉम्बचा समावेश झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, हँड्सकॉम्ब याअगोदरही विश्वचषकात खेळण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्मिथ आणि वॉर्नर यांचं पुनरागमन झाल्यामुळे त्याची निवड झाली नाही. विश्वचषकापूर्वी हँड्सकॉम्बने भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेललाही दुखापत झाल्याची माहिती आहे. पण तो सध्या पूर्णपणे फिट आहे. ग्लेन मॅक्सवेलला किरकोळ दुखापत झाली होती, पण तो आता फिट असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती लँगर यांनी दिली.

ऑस्ट्रेलिया सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. सेमीफायनलचं तिकीटही यापूर्वीच बूक केल्यामुळे ऑस्ट्रेलिया सध्या सेफ मोडमध्ये आहे. पुढील सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे. मालिकेतील हा अखेरचा साखळी सामना असेल. यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.