मनाली ट्रिपमध्ये नको ते केलं आणि मनात बसली भीती, शिखर धवनला करावी लागली HIV टेस्ट

आयुष्यात काही चुका चांगल्याच महागात पडतात. अशीच एक चूक क्रिकेटपटू शिखर धवनने केली आणि मनात भीतीचा काहूर माजला. अखेर एचआयव्ही टेस्ट केल्यानंतर मनाला समाधान लाभलं. याबाबतचा खुलासा खुद्द शिखर धवनने केला आहे.

मनाली ट्रिपमध्ये नको ते केलं आणि मनात बसली भीती, शिखर धवनला करावी लागली HIV टेस्ट
मनाली ट्रिपमध्ये नको ते केलं आणि मनात बसली भीती, शिखर धवनला करावी लागली HIV टेस्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 5:29 PM

नवी दिल्ली : आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनकडे पंजाब किंग्सची धुरा आहे. पंजाबने आयपीएल पर्वात एकही जेतेपद जिंकलेलं नाही. त्यामुळे शिखर धवनकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता शिखर धवनने नुकताच एका मुलाखतीत एचआयव्ही टेस्टबाबत खुलासा केला आहे. मनाली ट्रिपला जाऊन आल्यानंतर खूपच घाबरलो असल्याचं त्याने सांगितलं. इतकंच भीतीपोटी एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. गब्बर नावाने ओळखला जाणारा शिखर धवन याने एका वेबसाईटशी बोलताना याबाबतची खुलासा केला.

शिखर धवनला शरीरावर टॅटू गोंदवयला आवडतं. मात्र वापरलेल्या सुईने टॅटू गोंदवल्याने शिखर धवन पुरता घाबरला होता. त्यामुळे त्याने एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवनने सांगितलं की, “14-15 वर्षांचा असताना मनाली ट्रिपला गेलो होतो. या ट्रिपमध्ये घरच्यांना न सांगताच पाठीवर टॅटू गोंदवला. इतकंच काय तर 3-4 महिने टॅटू कोणाला दिसणार नाही याची काळजी घेतली.”

“आई वडिलांना कळल्यानंतर त्यांनी माझी चांगलीच धुलाई केली. टॅटू गोंदवल्यानंतर मी घाबरलो होतो. कारण त्या सुईने किती लोकांना गोंदवलं असेल, याची माहिती नव्हती. त्यामुळे एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.”, असं शिखर धवननं पुढे सांगितलं.

शिखर धवनची एचआयव्ही टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडला.धवनने आपला पहिला टॅटू पाठीवर गोंदवला होता. एका विंचूचा टॅटू होता. आता शिखर धवनच्या अंगावर बरेच टॅटू आहेत. यात भगवान शिव, अर्जुन यांचे टॅटू आहेत. अर्जुन एक उत्तम तीरंदाज होता म्हणून मी त्याचा टॅटू गोंदवल्याचं शिखर धवनने सांगितलं.

शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द

सध्या शिखर धवन भारतीय संघात नाही. मात्र आयपीएलमध्ये त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2023 मध्ये शिखर धवन पंजाब किंग्ससाठी कर्णधारपद भूषविताना दिसणार आहे. शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय, 68 टी 20, 122 फर्स्ट क्लास, 302 लिस्ट ए आणि 318 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत शिखर धवननं 7 शतकं आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 2315 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 17 शतकं आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6793 धावा केल्या आहेत. आंतराष्ट्रीय टी 20 सामन्यात 11 अर्धशतकांच्या जोरावर 1759 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 2 शतकं आणि 66 अर्धशतकांच्या जोरावर 9272 धावा केल्या आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.