World Cup | के एल राहुल सलामीला आल्यास चौथ्या नंबरवर कोण खेळणार?
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि केदार जाधव यांचे पर्याय आहेत. सध्या केदार जाधव महेंद्रसिंह धोनीनंतर सहाव्या क्रमांकावर येतो.
लंडन : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवडे संघाबाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाची ऐन वर्ल्डकपमध्ये डोकेदुखी वाढली आहे. धवन तीन आठवडे संघाबाहेर असला तरी तो त्यानंतर तरी वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार का हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अशा परिस्थितीत धवनऐवजी रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याबाबतची उत्सुकता आहे.
शिखर धवन बाहेर पडल्यामुळे सलामीसाठी के एल राहुलचा पर्याय कर्णधार विराट कोहलीकडे आहे. विश्वचषकात भारताचा पुढचा सामना 13 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. या सामन्यात रोहितसोबत के एल राहुल सलामीला उतरु शकतो. राहुलने यापूर्वी भारताकडून अनेक सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे तो प्रबळ दावेदार असू शकतो. मात्र राहुल जर सलामीला आला तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार हा प्रश्न आहे.
नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय!
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि केदार जाधव यांचे पर्याय आहेत. सध्या केदार जाधव महेंद्रसिंह धोनीनंतर सहाव्या क्रमांकावर येतो. जर राहुल सलामीला उतरला तर त्याच्या जागी केदार जाधव किंवा संधी मिळाल्यास दिनेश कार्तिक चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो.
विजय शंकरला संघात स्थान मिळण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
…तर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत
जर शिखर धवन वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाहेर पडला, तर भारतीय संघा त्याच्याजागी नवा खेळाडू बोलावू शकतात. धवनऐवजी श्रेयस अय्यर किंवा ऋषभ पंत यासारख्या खेळाडूंना टीम इंडियाकडून बोलावणं येऊ शकतं. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.
With Shikhar Dhawan injured, bring in Rishabh Pant. Making him open with Rohit Sharma, with a licence to go beserk!#CWC19 #CWC2019
— Mohandas Menon (@mohanstatsman) June 11, 2019
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या
Shikhar Dhawan : भारताला झटका, शिखर धवन 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर
‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले
नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय!