Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shikhar Dhawan | पक्ष्यांना दाणे टाकल्याने शिखर धवन अडचणीत, ‘बर्ड फ्लू’मुळे कारवाईची टांगती तलवार

प्रशासनाच्या आवाहनानंतरही नियमांचं उल्लंघन केल्याने शिखर धवनवर कारवाई केली जाऊ शकते.

Shikhar Dhawan | पक्ष्यांना दाणे टाकल्याने  शिखर धवन अडचणीत, 'बर्ड फ्लू'मुळे कारवाईची टांगती तलवार
'गब्बर'शिखर धवन
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 5:57 PM

उत्तर प्रदेश : टीम इंडियाचा (Team India) गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan) आपल्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र असेच काही फोटो शेअर केल्याने गब्बर अडचणीत सापडला आहे. यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Shikhar Dhawan in trouble for throwing seeds to birds possibility of action)

नक्की प्रकरण काय?

धवनने वाराणसीमधील (Ganga River) गंगा नदीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे (Migratory Birds) खायला दिले. शिखरने या पक्ष्यांना दाणे देतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो शेअर केल्याने तो अडचणीत सापडलाय. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका वाढतोय. बर्ड फ्लूमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतोय. या पार्श्वभूमीवर शासनाकडून पक्षांच्या संपर्कात न येण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र त्यानंतरही धवनने पक्ष्यांना दाणे खायला घातले. यामुळे धवनला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या संपूर्ण प्रकाराची स्थानिक प्रशासनाने दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशमधील माध्यमांनुसार धवनवर कारवाई केली जाऊ शकते.

या प्रकरणाची वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा (Kaushal Raj Sharma) यांनी दखल घेतली आहे. “बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांना काहीही खायला देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही धवनने पक्ष्यांना खाऊ देतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच या प्रकरणात नाविकावरही कारवाई केली जाऊ शकते. सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अधिक तपासानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेणार, अशी माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणी नक्की काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

धवन गंगा आरतीत सहभागी

धवन या वारणसी यात्रेत (Varanasi Tour) गंगा आरतीत सहभागी झाला. तसेच त्याने काशी विश्वनाथचे (Baba Vishwanath) दर्शन घेतले. धवनने आपल्या माथ्यावर चंदनाचा टीळा लावला. हा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला.

संबंधित बातम्या :

Bird Flu : बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू झाल्याचं दाखवा आणि बक्षिस मिळवा : सुनील केदार

India vs Australia 2020 | रेट्रो जर्सीमधील ‘गब्बर’ शिखर धवनचा किलर लूक

(Shikhar Dhawan in trouble for throwing seeds to birds possibility of action)

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.