World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंत भारतीय संघात

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आता विश्वचषकातून बाहेर पडला आहे. धवनऐवजी युवा फलंदाज ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंत सध्या इंग्लंडमध्येच आहे.

World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंत भारतीय संघात
Follow us
| Updated on: Jun 19, 2019 | 4:50 PM

लंडन : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आता विश्वचषकातून बाहेर पडला आहे. धवनऐवजी युवा फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंत सध्या इंग्लंडमध्येच आहे. आगामी सामन्यांसाठी तो भारतीय संघात असेल. वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 16 जून रोजी झालेल्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. धवनऐवजी विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. आता धवन संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे.

विश्वचषकात भारताचा पुढील सामना 22 जून रोजी अफगाणिस्ताविरुद्ध होणार आहे. या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहावं लागेल.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या निवडीदरम्यान ऋषभ पंतचं नाव चर्चेत होतं. मात्र दिनेश कार्तिकच्या अनुभवामुळे त्याची निवड झाली.  धवनला दुखापत झाल्याने ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश पक्का मानला जात होता. धवन फलंदाजी करत असताना, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सचा वेगवान चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. त्यामुळे धवनला दुखापत झाली.

संबंधित बातम्या 

… म्हणून धवनच्या जागी कुणालाही संधी नाही : विराट कोहली

Shikhar Dhawan : भारताला झटका, शिखर धवन 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर   

World Cup | के एल राहुल सलामीला आल्यास चौथ्या नंबरवर कोण खेळणार?  

शिखर धवनला दुखापत, ऋषभ पंत लंडनचं विमान पकडण्याच्या तयारीत 

टीम इंडियाचा स्टार जसप्रित बुमराचं या अभिनेत्रीसोबत डेटिंग?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.