‘गब्बर’कडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा

| Updated on: Nov 25, 2020 | 9:58 AM

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नव्या जर्सीसह खेळताना उतरणार आहे.

गब्बरकडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा
Follow us on

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour Australia 2020) काही अवघे तास शिल्लक आहेत. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. 27 नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया रेट्रो जर्सीमध्ये (New Retro Jersey) खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाचा ‘गब्बर’ शिखर धवनने (Shikhar Dhawan) या रेट्रो जर्सीमधील सेल्फी फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे. नवीन जर्सी, पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत, असं कॅप्शन शिखरने या फोटोला दिलं आहे. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) आहे. 1992 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचे खेळाडू अशीच जर्सी परिधान करायचे. त्यामुळे चाहत्यांनी धवनचा फोटो पाहून जुन्या भारतीय संघाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Shikhar Dhawan seen in Team Indias new jersey, fans remember old 90’s team)

धवनचा नव्या जर्सीमधील फोटो आणि 90 च्या दशकातील टीम इंडियाच्या शिलेदारांचे फोटो व्हायरल होत आहेत. दोन्ही जर्सींची आणि संघांची तुलनादेखील केली जात आहे. या दोन्ही संघांची कोणत्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही, असेही नेटीझन्सचे म्हणणे आहे. दरम्यान नवी जर्सी पाहून अनेक क्रिकेट चाहते जुन्या भारतीय संघाच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

ऑस्ट्रेलियाही नव्या जर्सीत मैदानात उतरणार

ऑस्ट्रेलियाचा संघही टीम इंडियाविरुद्ध नव्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 11 नोव्हेंबरला या जर्सीचं अनावरण केलं होतं. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचं देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी विशेष जर्सीचं डिझाईन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.

“या जर्सीची डिझाईन अ‍ॅसिक्स, टी फिओना क्लार्क आणि कोर्टनी हॉगेन यांनी केलं आहे. टी फिओना क्लार्क या दिवंगत क्रिकेटपटू मस्किटो कुसेन्स यांच्या वशंज आहेत. ही जर्सी मूळ, विद्यमान आणि भविष्यातील स्वदेशी खेळाडूंना समर्पित आहे”, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली. “ही जर्सी घालून खेळण्यासाठी मी उत्साहित आहे”, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्केने दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशी जर्सी परिधान केली होती.

एकदिवसीय आणि टी 20 मालिकेचे वेळापत्रक
एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

संबंधित बातम्या 

ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन

“तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल”

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ