T20 World Cup: “आठवतंय ना २ महिने आधीच बोललो होतो”झिम्बाब्वे हरवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर भडकला शोएब

| Updated on: Oct 28, 2022 | 10:24 AM

झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी कालच्या मॅचमध्ये 131 धावांचं टार्गेट पाकिस्तान टीम समोर ठेवलं होतं.

T20 World Cup: आठवतंय ना २ महिने आधीच बोललो होतोझिम्बाब्वे हरवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर भडकला शोएब
Shoaib-Akthar
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई  : टीम इंडियाकडून पाकिस्तान (Pakistan) पराभवपासून पाकिस्तानच्या चाहत्यांनी खेळाडूंवरती जोरदार टीका केली आहे. टीम इंडियाचा पराभव कर्णधार बाबर आझमसह (Babar Azam) पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या अधिक जिव्हारी लागला आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वेकडून पाकिस्तान पराभव झाल्यापासून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी चांगलेचं खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी कालच्या मॅचमध्ये 131 धावांचं टार्गेट पाकिस्तान टीम समोर ठेवलं होतं. सुरुवातीला पाकिस्तानची टीम ती धावसंख्या सहज पुर्ण करेल असं वाटतं होतं. परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भेदक मारा सुरु केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना अधिककाळ मैदानावर स्थिरावता आलं नाही.

काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये झिम्बाब्वेच्या टीमचा एका धावेने विजय झाला आहे. कालचा पराभव शोएब अख्तरच्या अधिक जिव्हारी लागला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून खेळाडूंचा चांगलाचं समाचार घेतला आहे. एका छोट्या टीमने तुम्हाला हरवलं आहे, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. आता तुम्ही उपांत्य फेरी तरी गाठू शकाल का ? असा सवाल सुद्धा त्याने उपस्थित केला आहे.

“आता तुम्हाला एखाद्या टीमचा पराभव होईल, मग आपल्याला संधी मिळेल असं वाटतं खेळाडूंना वाटतं असेल. पण आपल्यावर अशी परिस्थिती का आली? हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे.  मी मागच्या दोन महिन्यापुर्वी म्हटलं होतं की, सरासरी खेळाडू निवडले, तर सरासरी निकाल येतील” असं मत शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे.