Shoaib Malik : लग्न असो वा नो-बॉल.. प्रत्येक काम 3 वेळा करतो, शोएब मलिक तूफान ट्रोल

Shoaib Malik Memes : शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्याच्या आणि सना जावेदच्या लग्नामुळे शनिवारपासूनच तो ट्रेन्डमध्ये आहे. पण सोमवारी, २२ जानेवारीला तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला. खरंतर ट्रोल झाला, आणि त्यासाठी कारणीभूत ठरली त्याची गोलंदाजी.

Shoaib Malik : लग्न असो वा नो-बॉल.. प्रत्येक काम 3 वेळा करतो, शोएब मलिक तूफान ट्रोल
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 8:25 AM

Shoaib Malik Memes : शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्याच्या आणि सना जावेदच्या लग्नामुळे शनिवारपासूनच तो ट्रेन्डमध्ये आहे. पण सोमवारी, २२ जानेवारीला तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला. खरंतर ट्रोल झाला. मात्र, यावेळी तो चर्चेत येण्याचे कारण ना त्याचे तिसरे लग्न आहे ना त्याने गाठलेला कोणताही टप्पा.  यावेळी, पाकिस्तान क्रिकेटचा हा खेळाडू बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये त्याने टाकलेल्या एका ओव्हरमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तो पुन्हा पुन्हा तीच चूक करताना दिसला.

त्याने संपूर्ण सामन्यात केवळ 6 चेंडू टाकले परंतु गोलंदाजी करताना केवळ एकच चूक 3 वेळा केली. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात शोएब मलिकने एका षटकात तीन नो-बॉल टाकले.  सध्या सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर भडकले असून अनेक मीम्स बनवले जात आहेत. नव्या लग्नानंतर अवघ्या २ दिवसातंच त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मॅचमध्ये काय झालं ?

सोमवारी, २२ जानेवारीला बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये संपूर्ण मॅचमध्ये त्याने केवळ एकच ओव्हर टाकली पण ती त्यालाच फार महागात पडली. त्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना त्याने त्याने एकच चूक पुन्हा-पुन्हा केली आणि तीन नो-बॉल टाकले, एकूण 18 धावा दिल्या . पण सध्याच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात त्याची ही चूक लपून कशी राहील, उलट लोकांनी त्यांवर कमेंट्स करत त्याला ट्रोलही केले. काहीजण त्यावर मीम्सही बनवत आहेत.

लग्नानंतर झाला ट्रोल, आता गोलंदाजीमुळेही टीका

शोएब मलिकने गेल्या आठवड्यातच तिसरे लग्न केले. आयशा सिद्दीकी आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्याशी लग्न केल्यानंतर त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. लग्न झाल्यापासून तो ट्रेंडमध्ये आहे. आतापर्यंत सोशल मीडिया यूजर्स त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मीम्स बनवत होते, आता शोएब मलिकने त्यांना आणखी एक संधी दिली आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगमधील या तीन नो-बॉलमुळे शोएबवर बीरच टीका केली जात आहे, त्याची मजा घेतली जात आहे. काही युजर्स त्याच्या गोलंदाजीची तुलना मोहम्मद आमिरशी करत आहेत तर काही जण त्याला फिक्सर म्हणत आहेत. काही युजर्नसी तर असंही लिहीलं की ‘ लग्न असो किंवा नो-बॉल, तो सर्वकाही तीनदा करतो’.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.