सिक्सर किंगने मन बनवलं, युवराज सिंह निवृत्तीची घोषणा करणार!

मुंबई : टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत आहे. युवराज सिंह सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र, आयपीएलमध्ये केवळ त्याला चार सामन्यातच खेळता आलं. तर भारतीय संघात तो शेवटचा 2017 मध्ये दिसला होता. युवराज सिंह हा जगभरात प्रसिद्ध असलेल्या टी 20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्ती […]

सिक्सर किंगने मन बनवलं, युवराज सिंह निवृत्तीची घोषणा करणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत आहे. युवराज सिंह सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र, आयपीएलमध्ये केवळ त्याला चार सामन्यातच खेळता आलं. तर भारतीय संघात तो शेवटचा 2017 मध्ये दिसला होता. युवराज सिंह हा जगभरात प्रसिद्ध असलेल्या टी 20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडू निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे युवराज सिंहने जर परदेशी टी 20 लीगमध्ये सहभागी होण्याची तयारी केली असेल, तर त्याला भारतात निवृत्ती जाहीर करावी लागेल.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. तो बीसीसीआयशी याबाबत बातचीत करु इच्छित आहे. शिवाय आयर्लंड आणि हॉलंडमध्ये जीटी 20 (कॅनडा), युरो टी 20 यासारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे. तसा प्रस्ताव त्याने पाठवला आहे”.

भारतीय खेळाडूंना बाहेरील टी 20 स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयला नियमांची चाचपणी करावी लागते. अधिकाऱ्यांनुसार, युवराज निवृत्ती घेऊन तो बाहेरील स्पर्धांमध्ये सहभागी झाला, तरी तो भारतीय खेळाडू म्हणूनच गणला जाईल.

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.