India vs Australia | ‘या’ कारणामुळे सामना गमावला, कर्णधार विराटने सांगितलं पराभवाचं कारण
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला.
अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा (Australia vs India 1st Test) अॅडिलेड ओव्हलमध्ये (adelaide oval) खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात हारकीरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला. यामुळे कांगारुंना विजयासाठी 90 धावांचे माफक आव्हान मिळाले. परिणाम ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला. या पराभवासाठी टीम इंडियाच्या फलंदाजांना जबाबदार धरलं. मात्र या पराभवासाठी फक्त फलंदाजचं जबाबदार नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पराभवाचं मोठं कारणं सांगितलं आहे. Skipper Virat Kohli explained the reason for the defeat in the first Test against Australia
विराट काय म्हणाला?
“टीम इंडियाने पहिल्या सामन्यात कॅचेस सोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या संधीचा फायदा घेतला. परिणामी त्यांनी आपल्या खेळीत आणखी काही धावा जोडल्या. टीम पेनचा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. ऑस्ट्रेलियाची 110-7 अशी स्थिती होती. यावेळेस मयंकने पेनचा कॅच सोडला. त्यामुळे पेनने 70 पेक्षा अधिक धावा केल्या.तर लाबुशानेलाही जीवनदान मिळालं. कसोटी सामन्यात तुम्हाला अशा कॅच घ्यायला हव्यात. अन्यथा तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात”, अशी खंत विराटने सामन्यानंतर व्यक्त केली. विराट पत्रकार परिषदेत बोलत होता.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगच्या पहिल्या डावादरम्यान ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावात एकूण 4 कॅच सोडल्या. अर्थात 4 वेळा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करण्याची नामी संधी सोडली. मार्नस लाबुशानेला (Marnus Labuschagne) तब्बल 3 तर कर्णधार टीम पेनला (Tim Paine) 1 असं एकूण 4 वेळा जीवनदान मिळालं.
रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह आणि पृथ्वी शॉ या तिघांनी लाबुशानेचा कॅच सोडला. लाबुशानेला आधी 4 मग 15 धावांवर जीवनदान मिळालं. तर कर्णधार टीम पेनला मयंक अग्रवालने 26 धावांवर असताना जीवनदान दिलं. लाबुशाने आणि पेनने या संधीचं चांगलाच फायदा घेतला. लाबुशानेने 47 तर पेनने 73 धावांची खेळी केली. परिणामी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 पर्यंत मजल मारता आली.
दोन्ही फलंदाजांच्या कॅच सोडल्याने दोघांनी आपल्या खेळीत काही धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला कमी धावांची आघाडी मिळाली. जर योग्य वेळेस त्या कॅच घेतल्या असत्या तर, भारताला आणखी जास्त धावांची आघाडी मिळाली असती.
अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळण्याचा परिणाम?
कोरोनामुळे काही महिने सर्वच ठप्प होतं. याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नव्हतं. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका खेळली होती. ही मालिका फेब्रुवारी 2020 मध्ये खेळण्यात आली होती. त्यामुळे या 2 मालिकेदरम्यान बराचसा कालावधी निघून गेला. या विश्रांतीचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर झाला का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. मात्र त्याने या सर्व प्रकाराबाबत नकार दिला.
“आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे कसोटीमध्ये केव्हा काय करायलं हवं, याची आम्हाला जाण आहे. मात्र आम्ही या सामन्यात रणीनीतीची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलो”, अशी कबूली विराटने दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा आमच्याकडे 62 धावांची आघाडी होती. तसेच 9 विकेट्स हातात होत्या. आम्हाला यावेळेस चांगली कामगिरी करायला हवी होती. मालिकेतील पहिलाच सामना असल्याने आमच्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव नव्हता, असंही विराटने नमूद केलं.
दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. टीम इंडिया आधीच पिछाडीवर आहे. त्यात मनगटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे मोहम्मद शमी मालिकेबाहेर झाला आहे. यामुळे टीम इंडियासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत आव्हान असणार आहे.
संबंधित बातम्या :
Viral | सोशल मीडियावर व्हायरल होणारा 9420408404 हा नंबर नक्की काय आहे? जाणून घ्या
Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन
Skipper Virat Kohli explained the reason for the defeat in the first Test against Australia