Video : हरिस रौफच्या चेंडूवर कोहलीने मारलेल्या दोन षटकारांचा स्लो मोशन व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पण झालेल्या मॅचमध्ये विराट कोहली आणि हार्दीक पांड्याने चांगलीचं धुलाई केली.
मेलबर्न : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडिया यंदाचा विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकू शकतो अशी आशा चाहत्यांना आहे. सोशल मीडियावर क्रिकेटची अधिक चर्चा सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली (Virat Kohli), हार्दीक पांड्या आणि सुर्यकुमार यादव या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांना एक सूचक संदेश दिला आहे.
पाकिस्तानच्या फलंदाजांची टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वाईट अवस्था केली होती. पण शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी अधिक धावा काढल्या. टीम इंडियाचे सुरुवातीला काही खेळाडू बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हार्दीक पांड्याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली, त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.
— . (@Thalanikki) October 24, 2022
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पण झालेल्या मॅचमध्ये विराट कोहली आणि हार्दीक पांड्याने चांगलीचं धुलाई केली.
हरिस रौफच्या एका चेंडूवर कोहलीने उत्तुंग षटकार खेचला होता. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मैदानातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ स्लो मोशन आहे.