स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी ‘संकटमोचक’ बनून येणार
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका बरोबरीत सुटली असली तरी आता कसोटी मालिका सर्वात महत्त्वाची आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला पावसाने वाचवलं, पण कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला वाचवण्यासाठी दोन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ येणार आहेत. दोघेही सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगत आहेत. बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर स्मिथकडून कर्णधारपद आणि वॉर्नरकडून उपकर्णधारपद […]
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका बरोबरीत सुटली असली तरी आता कसोटी मालिका सर्वात महत्त्वाची आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला पावसाने वाचवलं, पण कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला वाचवण्यासाठी दोन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ येणार आहेत. दोघेही सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगत आहेत.
बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर स्मिथकडून कर्णधारपद आणि वॉर्नरकडून उपकर्णधारपद काढण्यात आलं. त्यांना याचमुळे आयपीएलमध्येही खेळता आलं नाही. दोघांनी आता नऊ महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ते आपल्या संघाच्या मदतीसाठी सज्ज झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी वॉर्नर आणि स्मिथवर बंदी असली तरी ते भारताविरुद्ध खेळण्यासाठी त्यांच्या गोलंदाजांना मदत करणार आहेत. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना मदत करण्यासाठी वॉर्नर आणि स्मिथ तयार झाले आहेत.
नेट्समध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या विरुद्ध खेळून भारतीय कर्णधार विराट कोहलीसारख्या फलंदाजांचा सामना करण्यासाठी स्मिथ आणि वॉर्नर त्यांच्या गोलंदाजांना तयार करणार आहेत. स्मिथ आणि वॉर्नरसारख्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियांच्या गोलंदाजांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा सातत्याने पराभव
जूनमध्ये इंग्लंडकडून पराभव, तर झिम्बाब्वेमध्ये टी-20 सीरीजच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव, यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्धची सीरीज 3-0 ने पराभूत, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव, असे एकामागोमाग एक पराभव ऑस्ट्रेलियन संघाला पचवावे लागले आहेत. आता होम ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियन संघ काही चमत्कार घडवतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला सामना – 6 डिसेंबर
दुसरा सामना – 14 डिसेंबर
तिसरा सामना – 26 डिसेंबर
चौथा सामना – 3 जानेवारी
वन डे मालिका
पहिला सामना – 12 जानेवारी
दुसरा सामना – 15 जानेवारी
तिसरा सामना – 18 जानेवारी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार