Womens T20 WC 2023: स्मृती मंधाना राईट हँडेड असूनही डावखुरी फलंदाजी करतेय? जाणून घ्या कारण
Smriti Mandhana Batter Style: स्मृती मंधाना आपल्या फलंदाजीने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडते. जर तुम्हाला सांगितलं ती लेफ्ट हँडेड नाही, तर तुमचा विश्वास बसणार नाही. मग असं काय झालं जाणून घ्या.
मुंबई- वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. पुरुष संघासारखं आता महिला क्रिकेट संघाला क्रीडा रसिकांकडून प्रेम मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात महिला क्रिकेट संघाला अच्छे दिन आले आहेत असंच म्हणावं लागेल. येत्या काही वुमन्स प्रिमियर लीगदेखील (Women’s Premier League) पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला संघात स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. आपल्या आक्रमक खेळीमुळे डावखुरी स्मृती क्रीडारसिकांची कायमच मनं जिंकली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? स्मृती मंधाना खऱ्या अर्थाने डावखुरी नाही. मग ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॅटिंग का करते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. एका मुलाखतीत स्मृती मंधानाने याबाबत खुलासा केला आणि क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
“खरं तर माझा भाऊ राईट हँडेड बॅटर आहे. पण वडिलांना त्याला लेफ्ट हँडेड बॅटर करायचं होतं. माझा भाऊ दोन तीन वर्षांचा होता. तेव्हा पप्पा त्याच्यासमोर लेफ्ट हँडेड स्टान्स घेऊन उभे राहायचे. पप्पा पण राईट हँडेड बॅटर होते. पण ते जाणीवपूर्वक तसेच उभे राहायचे. त्यामुळे भावाला राईट हँडेड बॅट पकडली जाते याची कल्पनाच नव्हती. तो वडिलांना पाहून तसाच उभा राहायचा. तसंच माझी आणि भावाची बॅटिंग स्टाईल सेमच आहे. काहीच फरक नाही.फक्त एका पोनी टेलचा फरक आहे.त्याला बघून बघून मलाही वाटलं की बॅट अशीच पकडतात.राईट हँडेड असा प्रकारच नसतो.”, असं स्मृती मंधानानं सांगितलं.
स्मृती मंधानाने आतापर्यंत 4 कसोटी, 77 एकदिवसीय आणि 112 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात स्मृतीने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 325 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 5 शतकं आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 3073 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी 20 सामन्यात 20 अर्धशतकांसङ 2651 धावा केल्या आहेत.
वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असणार आहे. वर्ल्डकप इतिहासात भारत आणि पाकिस्तान संघ 10 वेळा आमनेसामने आले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर टी 20 वर्ल्डकपमध्ये 6 पैकी चार सामन्यात भारत, तर दोन सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली आहे.
भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे