WPL Auction 2023 : सांगलीची वाघिण स्मृती मंधानाला लिलावात ऐतिहासिक बोली

भारताची महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला सर्वाधिक बोली लागली आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तिच्यावर फ्रेंचायसींनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे.

WPL Auction 2023 : सांगलीची वाघिण स्मृती मंधानाला लिलावात ऐतिहासिक बोली
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 1:13 AM

मुंबई  : वुमन्स प्रिमिअर लीगच्या लिलावामध्ये (WPL 2023) भारताची महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला सर्वाधिक बोली लागली आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तिच्यावर फ्रेंचायसींनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे.  वुमन्स प्रिमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 3.40 कोटींची बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांच्या फ्रेंचायसींमध्ये स्मृतीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर आरसीबीने यामध्ये बाजी मारली.

स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तिच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर तिला इतकी मोठी किंमत मिळाली आहे. स्मृती मंधाना ही जगातील टी-20 क्रिकेट मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील T20 लीगमध्ये खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्मृती मंधाना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन यांना आपला आदर्श मानते.

स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या महिला बिग बॅश लीगमध्ये 38 सामन्यांमध्ये 784 धावा केल्या आहेत. 130 च्या स्ट्राईक रेटने मंधानाने धावा केल्यात. इतकंच नाहीतर द हंड्रेडमध्येही ती खेळली आहे. 2022 मध्ये स्मृतीने 8 सामन्यांमध्ये 211 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय 112 टी-20 सामन्यांध्ये 2651 धावा स्मृतीने केल्या आहेत. यामध्ये तिने 20 अर्धशतके केली आहेत.

दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधाना भारतीय संघाची मुख्य खेळाडू आहे. मात्र जखमी असल्यामुळे तिला पहिल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळता येऊ शकलं नव्हतं. उर्वरित स्पर्धेत ती खेळेल की नाही याबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

एकूण खेळाडू: 18, परदेशी: 6 स्मृती मंधाना- INR 3.4 कोटी, सोफी डिव्हाईन – INR 50 लाख, एलिस पेरी – INR 1.7 कोटी, रेणुका ठाकूर – INR 1.5 कोटी, रिचा घोष – INR 1.9 कोटी, एरिन बर्न्स – INR 30 लाख, दिशा Kasat – INR 10 लाख रॉय – 10 लाख रुपये, श्रेयंका पाटील – 10 लाख , कनिका आहुजा – 35 लाख ,आशा शोबाना – 10 लाख, हीदर नाइट – 40 लाख रुपये, डेन व्हॅन निकर्क – 30 लाख , प्रीती बोस – 30 लाख रुपये खेमना – 10 लाख रुपये, कोमल झांजद – 25 लाख रुपये, मेगन शुट – 40 लाख , सहाना पवार – 10 लाख

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.