फॅन्ससाठी गुड न्यूज, स्मृती मंधाना लवकरच अडकणार लग्नबंधनात, या फेमस सिंगरच्या भावाला करत्ये डेट
भारतीय महिला क्रिकेट संघाची सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मंधाना तिच्या चमकदार फलंदाजीशिवाय तिच्या सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या देखील स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडबद्दल खूप चर्चा करत आहेत.
Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मंधाना तिच्या चमकदार फलंदाजीशिवाय तिच्या सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या देखील स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडबद्दल खूप चर्चा करत आहेत. टीम इंडियाची शानदार खेळाडू स्मृती मंधाना एका प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेच्या भावाला डेट करत असल्याची अफवा आहे. अनेक चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली आहे.
कोणाला डेट करत्ये स्मृती ?
अलीकडे, तीन वर्षांनंतर, BCCI ने भारतीय क्रिकेटपटूंसाठी वार्षिक पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये स्मृती मंधाना हिला BCCI तर्फे 2021-22 चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या पुरस्कारानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर पलक मुच्छाल हिचा भाऊ पलाश मुच्छाल याने स्मृतीला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पलाश मुच्छाल आणि स्मृती यांच्या नात्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात. बऱ्याच काळापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्यांच्यापौकी कोणीच यावर अद्याप मौन सोडलेलं नाही.
स्मृती मंधाना लवकरच करणार लग्न ?
भारतीय संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना आणि बॉलीवूड गायक पलक मुच्छालचा भाऊ पलाश मुच्छाल हे दोघेही लवकरच लग्न करू शकतात, अशाही चर्चा सुरू आहेत. पलक मुच्छालचा भाऊ पलाश मुच्छाल हा देखील बॉलिवूड गायक आणि संगीतकार आहे. पलाश मुच्छाल आणि स्मृती मंधाना या दोघांचे कुटुंबियही अनेक प्रसंगी एकत्र दिसले होते. स्मृती मंधानाला पाठिंबा देण्यासाठी पलाश मुच्छाल अनेकदा स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी जातो. मात्र, स्मृती मंधाना किंवा पलाश मुच्छाल या दोघांनीही अद्याप त्यांचे नाते सार्वजनिक केलेले नाही. सध्या चाहते या दोघांच्या डेटींग आणि लग्नाबाबत अंदाज लावत आहेत.