Women’s Asia Cup : फायनलमध्ये स्मृती मंधानाचा विजयी षटकार, महिला टीम इंडियाने सातव्यांदा आशिया चषक जिंकला
श्रीलंकेच्या महिला टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
महिला आशिया चषक (Woman asia cup 2022) सुरु झाल्यापासून कोण जिंकणार अशी चर्चा सोशल मीडियावर (Social Media) होती. बांगलादेशमध्ये (bangladesh) सुरु असलेल्या क्रिकेटचा संघर्ष अखेर आज थांबला. महिला टीम इंडियाने आज श्रीलंका टीमला (Shri lanka team) हरवल्याने चाहत्यांना अधिक आनंद झाला आहे. कारण आज श्रीलंका टीमने ना फलंदाजी, ना गोलंदाजी, ना क्षेत्ररक्षण व्यवस्थित केले. त्यामुळे महिला टीम इंडियाने सातव्यांदा आशिया चषक जिंकला.
????. ?. ???! ? ?
हे सुद्धा वाचाClinical performance from #TeamIndia as they beat Sri Lanka to win the #AsiaCup2022 title! ? ? #INDvSL
Scorecard ▶️ https://t.co/r5q0NTVLQC
? Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/C61b4s1Hc2
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
श्रीलंकेच्या महिला टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कुचकामी ठरविला कारण 20 ओव्हरमध्ये फक्त श्रीलंका टीमला 65 धावसंख्या उभारता आली. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी आजच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली.
स्मृति मांधनाने आजच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. महिला टीम इंडियाने आजच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना 8 ओव्हरमध्ये आपलं लक्ष्य गाठलं. स्मृति मांधनाने 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. ज्यावेळी जिंकण्यासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी स्मृति मांधनाने सिक्स मारुन चाहत्याचं मनं जिंकलं.