Saurav Ganguly : सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, जय शाह यांचा दावा

सौरव गांगुली यांनी अजूनही बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, असे जय शाह म्हणाले आहेत. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव तसेच बीसीसीआयचे सचिव आहेत.

Saurav Ganguly : सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, जय शाह यांचा दावा
सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं? नव्या इनिंगची घोषणा, भाजपात प्रवेश करणार?Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:36 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच क्रिकटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली. सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा (BCCI President) राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आता जय शाह यांच्या दाव्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सौरव गांगुली यांनी अजूनही बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, असे जय शाह (Jay Shah) म्हणाले आहेत. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव तसेच बीसीसीआयचे सचिव आहेत. सौरव गांगुली यांनी फक्त राजीनामा दिल्याच्याच बातम्या समोर आल्या नाहीत तर सौरव गांगुली हे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर निवडले जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच त्यांच्या भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला होता. मात्र या सर्व प्रकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

सौरव गांगुली यांची पोस्ट

काही वेळापूर्वीच गांगुली यांनी ट्विट करत नव्या इनिंगबाबत सूचक विधान केले आहे.  याच ट्विटमुळे गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांगुली 2019 मध्ये BCCI चे 39 वे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. BCCI मध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी, दिग्गज क्रिकेटर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष होते.

सौरव गांगुली यांच्या पोस्टमध्ये काय?

1992 ला माझा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आणि 2022 हे त्या प्रवासाचं तिसावं वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटनं मला भरपूर काही दिलंय. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिलेला सपोर्ट. मी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करु इच्छितो जो ह्या प्रवासाचा भाग झाला, पाठिंबा दिला आणि मदत केली. त्या बळावरच आज मी तिथं पोहोचलोय जिथं आहे. आज मी नवी काही योजना बनवतोय जी मला वाटतं की अनेक लोकांना फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल, अशी पोस्ट गांगुली यांच्याकडून काही वेळापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनतरी या प्रकरणाबाबत स्पष्टता आलेली नाही. तसेच गांगुली यांनीही अशा बातम्यानंतर काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.