कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर स्टेनटिंगद्वारे उपचार केले जाणार आहेत. डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकल्या जातील, असे वुडलँडस रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या सौरव गांगुली अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहे. (Sourav Ganguly health news live updates BCCi president hospitalised braking news)
सौरव गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे बुधवारी त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सरोज मोंडल यांनी गांगुलीवर उपचार केले. डॉ. आफताब खान हे सौरव गांगुली स्टेनटिंग करणार आहेत.काही दिवसांपूर्वी गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा गांगुलीची एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता.
या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.
सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द
सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.
Video | Ajinkya Rahane Dance With Arya | अजिंक्य रहाणे आणि मुलगी आर्याचा भन्नाट डान्स@ajinkyarahane88 #AjinkyaRahane #BabyGirl #Dance pic.twitter.com/DBLakmcsyP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या:
सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार
(Sourav Ganguly health news live updates BCCI president hospitalised braking news)