दादाला झटका, कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे

सौरव गांगुली रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तो करत असलेल्या खाद्यतेलाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली होती. ( Sourav Ganguly ads down)

दादाला झटका,  कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे
सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 12:35 PM

नवी दिल्ली: बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) वुडलँड्स रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. सौरव गांगुली आता सुखरुप आहे. गांगुलीच्या जीवाला आता कसलाही धोका नाही, अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालयाने दिली आहे. गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तो करत असलेल्या खाद्यतेलाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली होती. ( Sourav Ganguly oil promoting ads temporarily down)

सौरव गांगुली रुग्णालयात दाखल झाल्यानंतर फॉर्च्यून कंपनीच्या तेलाची जाहिरात चर्चेत आली होती. गांगुली संबंधित कंपनीच्या खाद्यतेलाची जाहिरात करत होता. यानंतर त्या जाहिरातीला सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात येत होते. संबंधित खाद्यतेलाच्या कंपनीने गांगुलीच्या जाहिराती थांबवल्याचं वृत्त इकोनॉमिक्स टाईम्स दिलं आहे. सौरव गांगुलींच्या सर्व जाहिराती संबंधित कंपनीकडून तात्पुरत्या काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. गांगुली रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या जाहिराती सोशल मीडियावर चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियावरुन त्या जाहिरातींना ट्रोल करण्यात येत होते.

किर्ती आझाद यांचा सौरव गांगुलीला सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि माजी खासदार किर्ती आझाद यांनी सौरव गांगुलीला त्या जाहिरातीवरुन एक सल्ला दिला आहे. “दादा लवकर बरे व्हा, स्वत: वापरलेली उत्पादनांची जाहिरात करत जा” काळजी घ्या, असा सल्ला किर्ती आझाद यांनी गांगुलीला दिला.

डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिमध्ये काय सांगितलं?

“गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्याला कशाचाही धोका नाही. गांगुली सध्या विश्रांती घेत आहे. गांगुलीचा रक्तदाब 110/70 इतका आहे. तसेच ऑक्सिजन लेवलही 98 इतकी आहे. गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण एकूण हार्ट ब्लॉक काढण्यात आले नाहीत. काही वेळात अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा

गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. यामुळे गांगुलीच्या हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच त्याला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित बातम्या:

अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

Sourav Ganguly Update: सौरव गांगुलीची तब्येत ठणठणीत, ऑक्सीजन सपोर्ट हटवले

(Sourav Ganguly oil promoting ads temporarily down)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.