संपत्तीतही ‘दादा’, सौरव गांगुलीची संपत्ती किती?

'बीसीसीआय'चा अध्यक्ष सौरव गांगुलीने तब्बल 354 कोटींची संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.

संपत्तीतही 'दादा', सौरव गांगुलीची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Oct 15, 2019 | 1:41 PM

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून ओळखला जाणारा गांगुली संपत्तीच्या बाबतीतही ‘दादा’ आहे. सौरव गांगुलीकडे 354 कोटींची संपत्ती (Sourav Ganguly Property) असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

‘बंगाल क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी असलेल्या गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर कॉमेंट्री सोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिराती करण्यावर बंधन येणार आहे. सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या गांगुलीने तब्बल 354 कोटींची संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.

गांगुलीच्या नावे कोलकात्यामध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्यात डझनभर खोल्या आहेत. या बंगल्याची किंमत सात कोटी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय 45 कोटींची स्थावर मालमत्ता सौरव गांगुलीच्या नावे असल्याचं म्हटलं जातं.

सौरव गांगुलीला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्या ताफ्यात ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंज यासारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमतही सात कोटींच्या आसपास आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly Property) समालोचनाकडे वळला. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाशीही तो निगडीत आहे. स्पोर्ट्स चॅनलवर कॉमेंट्रीचे तो सात कोटी रुपये घेत असल्याचं म्हटलं जातं. इतकं मानधन बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंनाही मिळत नाही.

व्यावसायिक जाहिरातींसाठीही गांगुली तगडं मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर ब्रँड एंडॉर्समेंटसाठी गांगुलीला दोन ते तीन कोटी रुपये मोजावे लागतात. इंडियन सुपर लीगच्या ‘एटलॅटिको द कोलकाता’ टीमचा तो सहमालक आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद आणि भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवल्यामुळे गांगुलीकडे मैदानासोबतच प्रशासनातील अनुभवही गाठीशी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.