Sourav ganguly : डिस्चार्ज मिळताच ‘दादा’नं काय केलं? जिवलग मित्रावरची खास पोस्ट वाचा
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सौरवने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, तसंच मेडिकल स्टाफचे आभार मानले आहेत
कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. सहा दिवसांच्या उपचारानंतर गांगुलीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सौरवने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, तसंच मेडिकल स्टाफचे आभार मानले आहेत. तसंच त्याचा जुना दोस्त तथा बंगालचे माजी क्रिकेटर जॉयदीप मुखर्जी यांचे आभार मानले, त्यांना थँक्यू म्हटलं. (Sourav Ganguly Says thanks His Friend After Discharge From Hospital)
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरवने इंन्स्ट्राग्राम अकाउंटवर त्याचा मित्र जॉयदीपबरोबर एक फोटो शेअर केला आहे. पाठीमागच्या सहा दिवसांमध्ये जॉयदीपने माझ्यासाठी जे केलंय, मी ते कधीच विसरणार नाही, असं त्याने म्हटलं. सौरव आपल्या इन्स्ट्राग्राम पोस्टमध्ये म्हणतो, ” जॉयदीप मी तुला पाठीमागच्या 40 वर्षांपासून ओळखतो. तू माझ्यासाठी माझ्या अडचणीच्या काळात जे काही केलंय ते मी आयुष्यभर विसरणार नाही.”
View this post on Instagram
सौरवचा मित्र असलेला जॉयदीप मुखर्जी कोण आहे?
53 वर्षीय जॉयदीप मुखर्जीने बंगालसाठी 13 रणजी ट्रॉफी मॅचेस खेळल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू असलेल्या जॉयदीपने 13 मॅचेसमध्ये 46.18 च्या सरासरीने 508 रन्स केलेत. तर आपल्या फिरकीने 9 विकेट्स देखील मिळवल्या आहेत. जॉयदीपचं प्रथम श्रेणी क्रिकेट 1987 पासून सुरु झालं . 1995 ला त्याने शेवटची लिस्ट ए मॅच खेळली.
गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेतून गांगुलीला एकूण 3 ब्लॉकेज असल्याचं निदान झालं. या शस्रक्रियेतून एक मोठा ब्लॉकेज काढण्यात आला. “हा काढण्यात आलेला ब्लॉकेज मोठा होता. यामुळे गांगुलीच्या हृदयाला सुरळित रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत होता”, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
We’ve got some good news.
The BCCI President Mr @SGanguly99 has been discharged from the hospital in Kolkata.
“I thank the doctors at the hospital for the treatment. I am absolutely fine. Hopefully, I will be ready to fly soon,” he said ?? pic.twitter.com/iNkmsjdeGS
— BCCI (@BCCI) January 7, 2021
गांगुलीसाठी देशभरातून प्रार्थना
गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीच्या उत्तम प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आली. अनेक क्रिकेटपटूंनी गांगुलीसाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या पत्नीशी फोनद्वारे संपर्क साधून चौकशी केली. तसेच मदतीचे आश्वासनही दिले होते.
गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा
गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हे ही वाचा
Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर ‘दादा’ ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
Sourav Ganguly | हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर सौरव गांगुलीवर अँजियोप्लास्टी