Sourav Ganguly | मला आणखी एक दिवस रुग्णालयातच थांबू द्या, गांगुलीचा मुक्काम वाढला
सौरव गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर त्याला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (Bcci President) अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) गुरुवारी 7 जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गांगुलीला आज 6 जानेवारीला मुक्काम देण्यात येणार होता. मात्र गांगुलीनेच रुग्णालयातील एक दिवसाचा मुक्काम वाढवून घेतला असल्याचं वुडलॅंड्स रुग्णालयाच्या (Woodlands Hospital) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली बासू (Dr Rupali Basu) यांनी सांगितलं. (Sourav Ganguly will be discharged from Woodlands Hospital in Kolkata on January 7)
#SouravGanguly who is admitted here is doing well. He is clinically fit. He wanted to stay back in the hospital for one more today so he will go home tomorrow: Woodlands Hospital, Kolkata pic.twitter.com/PxNyZHxbEu
— ANI (@ANI) January 6, 2021
रुपाली बासू काय म्हणाल्या?
“गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीला आज (6 जानेवारी) डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र गांगुलीने रुग्णालयात आणखी एक दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे गांगुलीला गुरुवारी 7 जानेवारीला डिस्चार्ज दिला जाईल”, असं बासू यांनी सांगितलं. गांगुलीचा रुग्णलयातील आजचा पाचवा दिवस आहे.
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर त्याला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्यानंतर गांगुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
दादाला झटका, कंपनीला फटका
गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर सोशल मीडियावर गांगुलीने केलेली खाद्यतेलाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. तुमच्या चांगल्या ह्रदयासाठी खाद्य तेल चांगलं असल्याचं या जाहिरातीत म्हटलं आहे. यामुळे या खाद्यतेलाच्या जाहीरातीवरुन नेटीझन्सने संबंधित कंपनीला चांगलेच ट्रोल केलं आहे. तसेच गांगुलीची खाद्यतेलाची जाहिरात काही काळासाठी थांबवण्यात आल्याचं वृत्तही समोर येत आहे.
गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा
गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
संबंधित बातम्या :
Sourav Ganguly | दादाला झटका, कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे
Sourav Ganguly | सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत दुसरी मोठी शक्यता, दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी होणार?
Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
(Sourav Ganguly will be discharged from Woodlands Hospital in Kolkata on January 7)