Sanju Samson : सौरव गांगुलीचं संजू सॅमसनच्या टीम इंडियातील भविष्याबाबत मोठं विधान
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे अधिक विधान करीत असतात, त्यामुळे त्यांची सुध्दा सोशल मीडियावर अधिक चर्चा असते.
आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंवरती जोरदार टीका केली होती. तसेच आयपीएलमध्ये (IPL 2022) चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये का संधी दिली नाही असा प्रश्न सुद्धा चाहत्यांनी त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या निवड समितीवर सुद्धा टीम इंडियाच्या माजी गोलंदाजांनी जोरदार टीका केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. परंतु फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे अधिक विधान करीत असतात, त्यामुळे त्यांची सुध्दा सोशल मीडियावर अधिक चर्चा असते. त्यांनी काल एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथं त्यांनी मुलांच्या आरोग्यबाबत काळजी व्यक्त केली.
संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये संधी मिळाल्याचं व्यक्तव्य सौरवने केलं. तसेच तो आयपीएलमध्ये एका टीमचा कर्णधार आहे. त्याने मागच्या आयपीएलमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. तसेच भविष्यात सुद्धा तो चांगली कामगिरी करेल असं वक्तव्य सौरवने एका कार्यक्रमात केलं आहे.